Top Post Ad

एकल महिला विशेष योजनेसाठी  निधी कमी पडू देणार नाही - ना.विजय वडेट्टीवार 

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिला तसेच विशेष गरजा असणाऱ्या लोकांसाठीच्या  विशेष योजनेसाठी  निधी कमी पडू देणार नाही - ना विजय वडेट्टीवार 



मुंबई


कोरोना विषाणूच्या परिणाम सर्वच क्षेत्रातील महिलांना करावा लागत आहे. यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला देखील सुटल्या नाहीत या महिलांच्या पाठीशी मदत आणि पुनर्वसन विभाग खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन  राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.     
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना विविध योजनांचा लाभ देणे बाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज वडेट्टीवार यांना निवेदन देऊन  दूरध्वनीवरून  चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. 


देशासह राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर निराधार गरीब महिलांची उपासमार होत आहे ही बाब लक्षात येताच वडेट्टीवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना धान्य तसेच आरोग्यविषयक मदत सेवा मिळाव्यात त्याचबरोबर गोरगरीब एकल महिलाकडे  मदत आणि पुनर्वसन विभाग विशेष लक्ष पुरवणार असल्याचं यावेळी सांगितलं.  आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना धान्य तसेच आरोग्यविषयक मदत सेवा मिळाव्यात त्याचबरोबर गोरगरीब एकल महिला त्यांच्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभाग विशेष लक्ष पुरवनार असून  पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला मदत पोहोंचत आहे की नाही याची खातरजमा करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


ज्या  कुटुंबाला धान्य असेल किंवा आरोग्य विषयक मदत लागत असेल या व्यवस्था पुरविण्यासंदर्भात संबंधित भागाला सूचना दिल्या असल्याचं त्यानी यावेळी सांगितले.  रोजगार हमी योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या बरोबर एकल महिलांच्या शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या मदतीने काम केले जावे याबाबत देखील स्वतः लक्ष घालणार असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे वडेट्टीवार यांनीं सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com