महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने त्या २७ परिचारिकां पुन्हा सेवेत महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने त्या २७ परिचारिकां पुन्हा सेवेत ठाणे


महापालिकेच्या २७ परिचारिकांचे दोन वर्षाचे कंत्राट संपले व त्यांना मुदतवाढ न दिल्याने त्यांची सेवा खंडीत झाली. या सर्व परिचारिकांनी महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या दोन वर्षांपासून कंत्राट पध्दतीवर काम करत होत्या . त्यांच्याकडून हे समजताच तात्काळ महापालिकेच्या संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून
तातडीने प्रशासनाला त्या २७ परिचारिकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचे निर्देश दिल्याची माहीती ठाणे महानगर पालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांनी रुग्णसेवेसाठी इच्छुक असणाऱ्यांना स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन केले आहे आणि या माझ्या भगिनी सेवेत कार्यरत असताना त्यांचे कंत्राट संपत असल्याचे समजताच सध्याची युध्दजन्य परिस्थीती लक्षात घेवून त्यांना कामावर घेणे गरजेचे होते. सध्या सर्वच रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका (नर्स) तसेच इतर कर्मचारी हे कोरोनाचा सामना युध्दपातळीवर करीत आहेत. हे काम करीत असताना आपण कायम सेवेत आहोत की, कंत्राटपध्दतीवर आहोत याचा कसलाच विचार न करता सर्व नर्स आपला जीव धोक्यात घालून डॉक्टरांसोबत कार्यरत आहेत. बुधवारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करणाऱ्या काही परिचारिका (नर्स) येवून बसल्या होत्या. याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजले की,


 


स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अशा धाडसी सेवकांना न्याय देण्याची संधी मला मिळाली. याबाबत मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने पाठपुरावा करुन या २७ परिचारिकांना मुदतवाढ मिळवून दिली. नोकरीचे कंत्राट संपणार याचा मनावर ताण असताना देखील या परिचारिका सेवा करीत होत्या, त्याबद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना या कोरोनाशी यशस्वी सामना करा, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत असे सांगत त्यांना धीर देवून आश्वास्त केले, व त्यांना पुन्हा नोकरी मिळवून दिल्याचे समाधान मिळाल्याचेही म्हस्के म्हणाले. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad