धारावीमध्ये कर्तृव्य बजावत असलेल्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

धारावीमध्ये कर्तृव्य बजावत असलेल्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबई


 महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनाशी लढा देताना पोलीस कर्मचाऱ्यांची मृत्यूची घटना समोर आल्यानंतर आता मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील धारावीमध्ये कर्तृव्य बजावत असलेले पालिकेचे अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पालिकेच्या असेसमेंट विभागात निरीक्षक म्हणून ते  काम करत होते.


धारावीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. पालिका आणि प्रशासनाकडून धारावीत युद्धपातळीवर काम सुरू आहे. मृत अधिकारी हे  धारावीमधील नागरिकांना अन्नवाटपचं काम पाहत होते. अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर मोठा धक्का बसला आहे.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 29 एप्रिलपर्यंत एकूण 6644 रुग्ण झाले आहेत आणि  270 कोरोनामृत्यू नोंदले गेले आहेत. शहरात 24 तासांत 475 रुग्णांची वाढ झाली.  आतापर्यंत 1593 रुग्णांना बरं करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यापैकी 205 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 29 एप्रिलपर्यंत राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. तर 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA