सर्वसामान्यांना मदतीसाठी रविंद्र चांगो शिंदे यांनी केले धान्यवाटप

सर्वसामान्यांना मदतीसाठी रविंद्र चांगो शिंदे यांनी केले धान्यवाटप
ठाणे


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीय बांधवांना याचा सर्वाधिक फटका बसला. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. याना आधार द्यायला महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन-अभियंता संघ पुढे सरसावले आहे.  महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन-अभियंता संघाचे अध्यक्ष रविंद्र चांगो शिंदे यांनी सर्वसामान्यांना मदतीसाठी धान्य वाटप केले. गहू, तांदूळ, डाळ, साखर, चहापत्ती, आणि तेलाची पिशवी असे पॅकेज या कुटुंबाना दिले. यामुळे अनेक कुटुंबांची काही दिवसाची अडचण संपली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि युनियनचे सरचिटणीस प्रमोद प्रल्हाद इंगळे आणि इतर सदस्य उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad