Top Post Ad

कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून सफाई कामगारांची निवासस्थाने रिकामी करण्याचा प्रशासनाचा डाव

कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून सफाई कामगारांची निवासस्थाने रिकामी करण्याचा प्रशासनाचा डाव


  ठाणे
ठाणे सिव्हिल रुग्णालयात कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना सक्तीने निवासस्थान खाली करण्यासाठी रुग्णालय प्रशासन दबाव आणत आहे. कोरोना संसर्गाचा कारण पुढे करत जर या कामगारांना कुटुंबातील लोकांसह स्थलांतरीत केले जात असेल, तर त्यांना पूर्ण सुरक्षित ठिकाणीच स्थलांतरीत करणे हे मानवीय द्रष्ट्या देखील आवश्यक आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी पासून राहून अनेक पिढ्या रुग्णसेवा करणारे केवळ सफाई कामगार आहेत म्हणून हा अन्याय अमानुष आहे. सरकारने खरं तर या सर्व सफाई कामगारांना मोफत मालकी हक्काची घरे देणे शासनाची जबाबदारी आहे.
कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ज्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याची योजना आहे, तिथे कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यात आले आहे. असे असेल तर मग सिव्हिल रुग्णालयात एका बाजूला असलेल्या चाळीत राहणाऱ्या या लोकांना स्थलांतरित करण्यामागे कोरोनाचे नावाखाली काय प्रशासकीय षडयंत्र आहे? याची पोलखोल होणे ही आवश्यक असल्याची मागणी श्रमिक जनता संघाचे सेक्रेटरी जगदीश खैरालिया यांनी पत्राद्वारे केली आहे. 
 सिव्हिल रुग्णालयात राहात असलेल्या चाळी आणि रुग्णालयाच्या मधे एक पार्टीशन / भिंत बांधून केवळ नोकरीचे कामासाठी संबंधित कामगारांना रुग्णालयात प्रवेश मान्य करावे. बाकीचे कुटुंबातील लोकांना रहदारीचा मार्ग दुसऱ्या बाजूला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जेणेकरून त्यांना ड्युटीवर देखील वेळेवर उपस्थित राहता येईल.  या कुटुंबातील लोकांना स्थलांतरित करणे अपरिहार्य असल्यास ठाणे शहरात बिल्डर्सनी बांधलेल्या रिकाम्या इमारती मध्ये त्यांचे पुनर्वसन करावे. व कोरोना महामारीच्या नंतर परत इथेच कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत. सिव्हिल रुग्णालयात काम म्हणजे अतिआवश्यक सेवा आहे. स्थलांतरित ठिकाणाहून कामावर येण्यासाठी शासकीय वाहतूक व्यवस्था करावी.समाजातील अन्य लोकांचे जीव वाचायला सफाई कामगारांचे बळी देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सिव्हिल रुग्णालयातून हाकलून कोरोना ग्रस्त रुग्ण असलेल्या इमारती / परिसरात त्यांना स्थलांतरित करता कामा नये. असेही खैरालिया यांनी जिल्हाधिकारी, ठामपा आयुक्त,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे. सिव्हिल सर्जन, ठाणे सिव्हिल रुग्णालय, तसेच  मुख्यमंत्री व ठाणे पोलिस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com