Trending

6/recent/ticker-posts

सोने आणि चांदीत वाढ, तर क्रूड आणि बेस मेटलच्या किंमतीत घट

कमोडिटीजसाठी सध्या संमिश्र वातावरण: एंजल ब्रोकिंग


~ सोने आणि चांदीत वाढ, तर क्रूड आणि बेस मेटलच्या किंमतीत घट ~


मुंबई,


 जागतिक कमोडिटी मार्केटवर कोरोना व्हायरसचा प्रभाव सतत दिसून येत आहे. सोमवारी सोने आणि चांदीत वाढ, तर क्रूड आणि बेस मेटलच्या किंमतीत घट दिसून आली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कमोडिटीजकरिता सध्या संमिश्र वातावरण आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने मजबूत मदतीचे पॅकेज जाहीर केले आणि इतर केंद्रीकृत बँकांनी सोने-चांदी या धातूंसाठी चालना दिल्याने यलो मेटलच्या किंमतींनाही आधार मिळाला आहे. अनेक आठवडे किंमतीत घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढू लागल्या आहेत. कारण जागतिक वाढीतील अनिश्चिततांमुळे गुंतवणूकदार यलो मेटलकडे वळू लागले आहेत. त्यामुळे ही सुरक्षित मालमत्ता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. 


जगातील प्रमुख सेंट्रल बँकांनी मदतीच्या खंद्या उपाययोजना केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींना थोडा आधार मिळाला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेने अनुभवलेल्या कार विक्रीतील घसरणीच्या पार्श्वभूमीवर युरोप आणि अमेरिकेतील वाहन क्षेत्रातील विश्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्रातील धातूंच्या मागणीवर मोठा


परिणाम दिसून येईल, असे संकेत मिळतात. तथापि प्रमुख मध्यवर्ती बँकांनी या साथीवर मात करण्यासाठी अनेक मदतीच्या उपाययोजना केल्याने जागतिक आर्थिक चिंता कमी होतील आणि बेस मेटलच्या किंमतींनाही आधार मिळेल, अशी आशा प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या