जागतिक मंदीच्या चिंतेमुळे सोन्याच्या किंमती नियंत्रणात
मुंबई
एका महिन्याच्या लॉकडाउननंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यस्था पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यामुळे बाजारपेठेच्या भावनांना प्रोत्साहन मिळाले असून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी झाली. तथापि, कोरोनामुळे जगभरात २ दशलक्षहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून १,३६,६६७ जणांचा मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे जागतिक मंदीची चिंता वाढत आहे. परिणामी सोन्याच्या किंमतीही नियंत्रणात असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
कोव्हिड-१९ या आजाराचा विळखा वाढत जातोय, त्यामुळे अशा वातावरणात तीव्र झटका टाळण्यासाठी गुंतवणूकदार कमोडिटीजवर आक्रमक खेेळी करणे टाळत आहेत. सर्वच मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना केली असली तरी सर्व औद्योगिक कामकाज सुरळीत सुरु होण्यासाठी काही कालावधी लागेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय. गुरुवारी, स्पॉट गोल्ड सोन्याचे दर ०.११ टक्के वाढून $1717.7 प्रति औसांवर बंद झाले. स्पॉट सिल्व्हर किंमती ०.९४ टक्क्यांनी वाढून $ १५.६ प्रति औसांवर बंद झाल्या. तर एमसीएक्सचे दर ०.५१ टक्क्यांनी वाढून ४४, २५५ रुपये प्रति किलोवर बंद झाले.
ओपेक प्लस देशांनी उत्पादन कपात केल्याने आणि अमेरिकेने किंमतींना आधार दिल्याने गुरुवारी, कच्च्या तेलाच्या किंमती $१९.९ प्रति बॅरलवर आल्या. असे असले तरी लॉकडाउनमुळे औद्योगिक कामकाज बंद आहे, त्यामुळे तेलाच्या किंमतींवर याचा परिणाम होत आहे. ओपेक आणि सदस्य राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन काही काळासाठी दररोज १९.५ दशलक्ष बॅरलनी कमी करण्याचे ठरवले आहे. मार्च २०२० मध्ये तेलाच्या किंमती १८ महिन्यांमध्ये सर्वात कमी झाल्या होत्या, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्या. विविध देशांनी लॉकडाउन जाहीर केल्याने औद्योगिक मागणी घटली, त्यामुळेही तेलाच्या किंमती प्रचंड प्रमाणात घसरल्या असल्याचे श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. मंदीच्या चिंतेनेही तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला. तथापि, ओपेक प्लस समूहाने उत्पादन कपातीचा घेतलाला निर्णय तसेच अमेरिकेतील उत्पादन कपात केल्यामुळे तेलावरील संकट काही प्रमाणात कमी झाले आहे.
लंडन मेटल एक्सचेंजमधील बेस मेटलच्या किंमती दोलायमान दिसल्या. औद्योगिक धातूंची मागणी कमी झाल्याने जागतिक मंदीची शक्यता आदी चिंता बाजारासमोर आहेत. चीनमधील काही सकारात्मक आर्थिक डेटामुळे धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. तथापि उर्वरीत जगात औद्योगिक कामकाज बंद असणे हे आर्थिक घसरणीचे संकेत असून यामुळे धातूंच्या मागणीत मोठी घट होत आहे. एलएमई कॉपरचे दर ०.५६ टक्क्यांनी वाढून प्रति टन ५१४० डॉलरवर बंद झाले. चीनच्या सकारात्मक आकडेवारीमुळे रेड मेटलच्या किंमतींना दिलासा मिळाला. एलएमई व्हेरिफाइड वेअरहाउसमधील कॉपर इन्व्हेंटरी लेव्हल २०२० च्या सुरुवातीला आघाडीच्या धातूच्या मागणीत घट झाल्याचे दर्शवते.
0 टिप्पण्या