एमजी मोटर इंडियाची मेडक्लिनसह हातमिळवणी
~ कारसाठी इंडस्ट्री-लीडिंग केबिन स्टरलायझेशन टेक्नोलॉजी आणणार ~
मुंबई
एमजी मोटर इंडियाने आपल्या कारच्या केबिनची हवा आणि पृष्ठभाग नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी सिंगापूरमधील मेडक्लिन कंपनीशी हातमिळवणी केली. हेक्टर आणि झेडएस ईव्ही या भारतीय उत्पादनांमध्ये मेडक्लिनची पेटंट केबिन स्टरलायझेशन टेक्नोलॉजी सेराफ्यूजन इन्स्टॉल करण्यासंबंधी व्यवहार्यतेचे मूल्यांकन आता एमजी मोटर इंडिया करेल.
युनिक आणि गेमचेंजिंग इनोव्हेशन असल्याने सेराफ्यूजन टेक्नोलॉजी प्रवाशांचे आरोग्य आणि वेलनेसची हमी देत कारचे केबिन पूर्णपणे जंतूविरहित आणि स्टरलाइज करते. कोणत्याही रसायनाविना सक्रियतेने अॅलर्झन्स, प्रदुषके आणि सूक्ष्मजीवांना निष्प्रभ करण्यासाठी सक्रिय ऑक्सिजनचा वापर या तंत्रज्ञानात केला जातो. हे सोल्युशन केबिनमधील हवेतील बॅक्टेरिया, मोल्ड, यीस्ट आणि व्हायरस नष्ट करते तसेच कारमधील विविध पृष्ठभागही जंतूविरहीत करते.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव चाबा म्हणाले,‘ नावीन्य आणि सुरक्षेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळेच या क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक कंपनी मेडक्लिनशी आम्ही भागीदारी करत आहोत. जेणेकरून आमच्या वाहनांमध्ये जागतिक स्तरावरील केबिन स्टरलायझेशन सोल्युशन इन्स्टॉल करण्याची शक्यता आहे. आम्ही सक्रियतेने एचव्हीएसी सिस्टिम बेस्ड केबिन स्टरलायझेशन आणि डिशइंफेक्शन टेक्नोलॉजी तैनात करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना स्वच्छा आणि सुरक्षित कारसोबत सुरक्षित परिवहनाचा अनुभव आणि सेवा विकसित करण्याच्या दिशेने काम सुरूच ठेवूत. फ्यूचर फॉरवर्ड ब्रँडच्या रुपात ही नवी सुरुवात कोरोनाच्या साथीनंतर जगातील ‘न्यू नॉर्मल’ प्रति आमची तत्परताही दर्शवते.'
0 टिप्पण्या