Top Post Ad

कर्ज घेऊन पळालेल्या उद्योगपतींची 68 हजार 607 कोटींची कर्जे माफ

कर्ज घेऊन पळालेल्या उद्योगपतींची 68 हजार 607 कोटींची कर्जे माफ


मुंबई 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 बड्या कर्जबुडव्यांचे (`विलफुल डिफॉल्टर'चे) 68 हजार 607 कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली दिली आहे.  कर्ज माफ करण्यात आलेल्या कार्जबुडव्यांमध्ये पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीचाही समावेश असल्याचे आरबीआयने महिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जामध्ये 50 मोठे कर्जबुडवे आणि 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी घेतलेल्या कार्जाची काय स्थिती आहे यासंदर्भात माहिती मागवली होती. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 16 फेब्रुवारी 2020 रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी हा अर्ज केला असं साकेत यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितलं.  केंद्र सरकारने माहिती देण्यास नकार दिला असला तरी आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी साकेत यांच्या अर्जाला उत्तर दिलं आहे. 24 एप्रिल रोजी दिलेल्या या उत्तरामध्ये कर्जबुडव्यांबद्दलच धक्कादायक माहिती समोर आल्याचे साकेत यांनी म्हटलं आहे. या रक्कमेमध्ये (68 हजार 607 कोटी रुपये) थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत.  देशातील शिखर बँक असण्राया आरबीआयने कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे. यासाठी बँकेने सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2015 रोजी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ दिला आहे, असं साकेत यांनी एआयएनएसला सांगितलं.  


सर्वाधिक कर्जमाफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये चोक्सीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण 5 हजार 492 कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे 1 हजार 447 आणि 1 हजार 109 कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोक्सीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोक्सीचा भाचा आणि 13 हजार कोटींच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे.  


सर्वाधिक कर्ज माफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये दुस्रया क्रमांकावर आरआयई अॅग्रो लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने 4 हजार 314 कोटींचे कर्ज घेतले होते. या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभरापासून आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्राया सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे.  


तिस्रया क्रमांकावर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अॅण्ड ज्वेलरी या कंपनीचा समावेश असून कंपनीने 4 हजार 76 कोटींचे कर्ज घेतले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीची चौकशी सुरु आहे.  


दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱया कंपन्याच्या यादीमध्ये कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या पेन निर्मिती क्षेत्रातील कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी कोठारी ग्रुपचा भाग असून कोठारी ग्रुपने 2 हजार 850 कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (2 हजार 326 कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदौर (2 हजार 212 कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (2 हजार 12 कोटी) या कंपन्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.  


एक हजार कोटींची कर्ज घेतलेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (1 हजार 962 कोटी) आणि फरार असणाऱया विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (1 हजार 943 कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या आणि कर्जमाफीत समावेश झालेल्या 25 कंपन्या आहेत. या कंपन्यांनी 605 कोटी ते 984 कोटींदरम्यान कर्ज घेतलं आहे. कर्ज माफ  कंपन्यांच्या यादीमध्ये बाबा रामदेव यांच्या कंपनीचाही समावेश आहे. 


50 मोठ्या कर्जबुडव्यांपैकी 6 जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. या कर्जबुडव्यांनी मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय बँकांना फसवले. त्यापैकी अनेकजण फरार आहेत किंवा त्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे असं साकेत यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या 50 कंपन्यांमध्ये सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com