Top Post Ad

ठाण्यातील मनपा, नपा हद्दीतील भाजी मंडई फळ बाजार १४ एप्रिल पर्यत बंद - जिल्हाधिकारी

मनपा, नपा हद्दीतील भाजी मंडई , भाजीपाला,फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने आजपासुन १४ एप्रिल पर्यत बंद

 

   जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश

 

ठाणे

ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने आज दि. १० एप्रिलच्या बारा वाजेपासून मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. 

संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची सूट देण्यात आलेली होती. मात्र ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडई मध्ये नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती तसेच सुरक्षित अंतराचे नियमही पाळले जात नव्हते. त्यामुळे वारंवार संचारबंदी आदेशाचा भंग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वेळोवेळी याबाबत नागरिकांना आवाहन तसेच कायदेशीर कारवाई करूनही लोकांच्या वर्तनात फरक न पडल्याचे निदर्शनात आल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने भाजी मंडई भाजीपाला बाजार फळ बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  हे आदेश फक्त मनपा नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असतील. त्याचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b)रोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.


 

 

जांभळी नाका येथील दुकानदारांना थेट विक्री करण्यास मज्जाव - महापालिका आयुक्त


 दरम्यान कोरोना कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी किराणामाल दुकानदारांनी सोशल डिस्टान्स नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करुन महापालिका आयुक्त सिंघल यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाल मार्केट बंद करण्याबरोबरच तेथील होलसेल किराणामाल दुकानदार सोशल ‍डिस्टन्स पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज येथील दुकानदारांना थेट विक्री करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला. तथापि, दूरध्वनीवरुन मालाची ऑर्डर घेवून त्यानुसार डिलीव्हरी करण्याचा पर्याय  त्यांना उपलब्ध करुन दिला आहे.       या निर्णयामुळे आता जांभळीनाका किराणा होलसेल मार्केट दुकानांत ग्राहकांना थेट सामान विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून दूरध्वनीवरुन अथवा ऑनलाईन पध्दतीने माल विकण्यास परवानगी असणार आहे. घाऊक विक्रेत्यांना दूरध्वनी किंवा ऑनलाईन  नोंदणी घेवूनच त्यांचा माल किरकोळ विक्रेत्याच्या दुकानात थेट पोहचवावा लागणार आहे.   घाऊक विक्रेत्यांनी कुठल्‌याही परिस्थिमध्ये फुटकळ  खरेदी ग्राहकांना विक्री करता येणार नसून  सर्व  ‍विक्री ही ऑनलाईन व दूरध्वनीवरुन ऑर्डर घेवूनच करावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दुकानावर गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदारांनी घ्यावी असे स्पष्ट करुन एकाच वेळी 4 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सींग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांचीही असून त्यांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर आवश्यक ती कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच साथ प्रतिबंधक कायदा 1897 तसेच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायदेशीर कार्यवाही करुन दुकानांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com