खा डॉ श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ठामपा आणि कडोंमपाला प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर*ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर*


*ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केले सुपूर्द*ठाणे / कल्याण


 ठाणे महानगरपालिकेत महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपळे आणि कृष्णा डायगोनिस्टकचे संचालक राजेंद्र मुथा यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे10 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे 10 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. ठाणे आणि कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा शब्द आठवडाभराच्या आतच पूर्ण केला आहे.


कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा डॉ श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महापालिका रुग्णालयांना आज 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.  अमेरिकेच्या पलमोनेटिकस कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाने केलेल्या या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येऊ शकणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या अतिगंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी आता मुंबईत हलविता येणे शक्य होणार आहे. दोन्ही पालिकेच्या आयुक्तांच्या समवेत खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांच्या समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक सूचना केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad