Top Post Ad

ही तर एक हिंसक विकृती......

ही तर एक हिंसक विकृती......मा. गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांना मंत्रीमंडळातुन बडतर्फ करण्यासाठी विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व त्यांच्या लष्करानी आता कंबर कसली आहे. खरे तर देवेंद्र फडणवीस व कंपू च्या मनात 2014 पासुन आव्हाडांबद्दल आकस राहिला आहे. याचे खरे कारण म्हणजे राजमाता जिजाऊसाहेबांच्या बदनामी करणाऱ्या पुरंदरेना जेंव्हा  फडणवीसांनी महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर केला तेंव्हा त्या विरुद्ध आव्हाड साहेबांनी महाराष्ट्र जागा केला होता, आणि तेंव्हापासुन खरेतर हा पोटशूळ आहे जो यानिमित्त्य उफाळून आला . अनंत चुरमुसे नामक विकृती बद्दल व त्याच्या मागील काही हालचाली बद्दल माहिती मिळवली असता तो "आंबा गँगचा" कार्यकर्ता असल्याचे कळले. त्याच्या विध्वसंक विकृतीच्या रडारवर राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा पवार साहेब तर मराठा सेवा संघ संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांपासून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ चालवणारे अनेक नेते, विचारवंत राहिलेले आहेत.
चुरमुसे एक विकृती असल्यामुळे व त्याची जडणघडण एका हिंसक संघटनेत झाल्यामुळे तो अशी भाषा करतोय . आता खरा प्रश्न हा आहे की गेल्या पाच वर्षात याला देवेंद्र फडणवीस यांनी अभय का दिले. याचा अर्थ केवळ आणि केवळ विकृती पोसणे हाच होता असे दिसून येते. यानिमित्तानं का होईना लोकशाही न मानणारे लोकशाहीची भाषा करायला लागले हे दिसून आले. ती विकृती चोपल्या गेली हेही योग्य झालं.हिंसेचं समर्थन करणे चुक आहे हे खरे असले तरी एखादं बोकड जर मस्तवाल झाला असेल तर त्याला जगद्गुरू तुकोबा लिहितात तेही खरे आहे,
"दया तिचे नाव l भुतांचे पालन l  आणिक निर्दालन l कंटकांचे ll
अशी विकृती पोसणाऱ्या फडणवीसानी आता एक लक्षात ठेवावे, इथुन पुढे पुरोगामी चळवळी चालवताना जर धमक्या, बदनामी, चरित्रहनन ह्या गोष्टी करायला कुणी धजावत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तरं मिळतील. महाराष्ट्र आता जागा होतोय. काही सडके आंबे सोडले तर राज्यात शाबूत बुद्धी चे व भरीव मनगटाचे तरुण जास्त प्रमाणात आहेत.
फडणवीस जी आपण आव्हाड साहेबांना राजीनामा कसला मागताय? उलट त्यांचे वर मारहाणी चे आरोप केलेत म्हणुन आपण जाहीर माफी मागावी व कोरोना सारख्या बिकट परिस्तिथीत राज्य असताना आपण जाणीवपूर्वक जे चुकीचं राजकारण करत आहात हे महाराष्ट्र विसरणार नाही. विरोधी पक्ष नेते पद सांभाळण्यात आपण असमर्थ आहात असे समजुन स्वतः तात्काळ राजीनामा द्यावा.
" शिव शाहु फुले आंबेडकरांचा" पुरोगामी महाराष्ट्र आव्हाड साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आंबा गँग च्या विकृतीला चोपून काढणाऱ्यांचे "सद्रक्षणाय खलनिग्रणाय" या शब्दात अभिनंदन.


!! जय जिजाऊ !जय शिवराय !जय भिम !!
( साभार अमोल रामकृष्ण मिटकरी )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com