वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱे आरोपी गजाआड


वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱे आरोपी गजाआड

 


शहापूर

 

लॉक डाऊनच्या काळात वणवा लावणे, वन्य जीवांची शिकार करणे, वन जमिनीवर अतिक्रमण करणे आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शहापूर तालुक्यातील वनविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या आरोपींना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. शहापूर तालुक्यातील शहापूर वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजे भातसई परिमंडळ वासिंद मधील राखीव वनक्षेत्रात आरोपींनी वन जमिनीवर साफसाफाई करून शेतीसाठी व घरासाठी अतिक्रमण करत असतांना तीन आरोपींना ताब्यात घेतले असून शेतीसाठीचे अतिक्रमण नष्ट करण्यात आले आहे.

 

सदर आरोपीं विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून शुक्रवारी सकाळी शहापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. अशी माहिती शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली. आरोपींमध्ये पवन भोईर, महादू माळी, वामन वेहळे सर्व राहणार भातसई यांचा समावेश आहे. ही कारवाई  व्ही. टी. घुले, उप वन संरक्षक शहापूर यांचे मार्गदर्शनाखाली शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वनपाल दगडू घुगे, कमलाकर मोरघे, दत्तात्रय शिंदे, अनिल धारावणे तसेच वनरक्षक पद्माकर दलाल, गजानन धुलघूनडे, नामदेव बांगर, सेमल भोसले, रमाकांत वाघमारे, विजय फळले, श्रीमती आरती दगडे यांनी सदरची कारवाई केली. 

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad