Top Post Ad

शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याची त्वरीत चौकशी करा अन्यथा आंदोलन

शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याची त्वरीत चौकशी करा अन्यथा आंदोलन
राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साबळे यांचा इशारा



  मुंबई
 नागपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती शालिनी शर्मा यांच्यावर जाणूनबूजुन हल्ला करणाऱ्या जमावाची चौकशी करुन गुन्हे दाखल करा अन्यथा  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संदिप साबळे यांनी दिला आहे.  नागपाडा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी साबळे यांनी आज शर्मा यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
    नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून नागपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीसांची कोणतीही परवानगी न घेता जमाव एकत्र होऊन आंदोलन छेडले गेले होते. सीएए  विरोध करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकत्र जमला होता. याच पार्श्वभुमीवर येथील जमावाने पोलीसांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता रस्त्यावर स्टेज उभा केला होता.सदरचा स्टेज पुर्वपरवानगी न घेता किंवा अनधिकृत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कारवाई करण्यासाठी श्रीमती शालिनी शर्मा गेल्या. आंदोलनाबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर जमावाने धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.  त्यावर विविध स्तरावरुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.
    सदर घटनेबाबत राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप साबळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की सौ.शर्मा यांच्यासोबत झालेली वागणुक निश्चितच अपमानास्पद आहे. कायदा व सुव्यवस्था संतुलित रहावी म्हणुन पोलीस अधिकारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सुरक्षा देत असतात.त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. मात्र आंदोलनाच्या नावाखाली महिला पोलीसांना कोण लक्ष करीत असेल तर राजमुद्रा प्रतिष्ठान गप्प बसणार नाही.


  मी किंवा जमाव असेल जे  धक्काबुक्की करण्यास दोषी असतील त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरुन कारवाई निश्चित होणार आहे.आम्ही आंदोलनात जो काही प्रकार घडला त्याची सत्य चित्रफित वरिष्ठांना दिली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, धक्काबुक्की करणाऱ्या  व्यक्तिंचा तपास होऊन गुन्हे दाखल होतील.
   - श्रीमती शालिनी शर्मा,   वरिष्ठ पोलीस निरिक्षक,नागपाडा पोलीस स्टेशन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com