Top Post Ad

मध्य रेल्वेमार्फत मोफत फूड पॅकेट वितरण व रक्तदान शिबिर

मध्य रेल्वेमार्फत मोफत फूड पॅकेट वितरण व रक्तदान शिबिर




मुंबई
 कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने २८.३.२०२० रोजी मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे १००० अन्नाची पाकिटे वाटली. सर्व विभागांतील रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची समर्पित पथके चोवीस तास कार्यरत आहेत.   छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई आणि मुंबई सेंट्रल येथील आयआरसीटीसी बेस किचन मध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार करीत आहेत.   आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून सुमारे २००० फूड पॅकेट तयार केली जात आहेत आणि त्याचे वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत वितरित केले जात आहे.
 याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉल मालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पॅकेट वितरणात वैयक्तिक योगदान देत आहेत.  आजच सोलापूर विभागात १४० खाद्यपदार्थांचे पाकिटे, नागपूर १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, पुणे विभाग १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, मुंबई विभाग व भुसावळ जवळपास ३५० खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू व गरीब लोकांना वाटण्यात आली आहेत.  लातूर स्थानकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले.  प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर, स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्या. अशी माहिती २९ मार्च रोजी मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई  येथून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com