तेवीस हजाराहून अधिक किमतीचा गुटखा व तंबाकुजन्य पदार्थ जप्त
ठाणे :
मुंबई अहमदाबाद महामार्ग मौजे आबोली गावचे हद्दीत पटेल हॉटेल येथे दोन जणांसह ट्रक पकडण्यात आला आहे. ज्यामध्ये सुमारे २३ हजाराहून अधिक किमतीचा गुटखा व तंबाकुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. मानवी आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने अधिसुचनाद्ववारे वाहतुकीस / विक्रीस प्रतिबंध केलेला माल विक्री करण्यासाठी घेवुन जात असताना १ मार्च रोजी पोलिसांनी या दोन जणांना अटक केली आहे. सलीम ततासीम आलयी राहणार युपी, सोनु रामनिवास बुरा हरीयाणा अशी दोघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ७,५६,०००/-रु.कि. शुद्ध प्लस पान मसाल्याचे ४२०० पाऊच, २) ७,५६०/- रु. कींमतीचे राजश्री पान मसाल्याचे ४५ पॅकेट, २) २,७००००/- रु. एस. प्लस तंबाखुचे ९,०००/- पॅकेट, ३) ७४,८००/- रु. कींमतीचे विमल पान मसाल्याचे ४०० पॅकेट, ४) १३,२००/- रु. कींमतीचे व्ही. -२ टॉबॅकोचे ४०० पॅकेट, ५) १२,००,०००/- रु. कि. एक नारंगी रंगाचा कंटेनर ट्रेलर त्यास पाठीमागील व पुढील बाजुला एच. आर. ३८ वाय. २४८७ अशी नंबर प्लेट असलेली जू. वा.की.सु. असा एकुण २३,१४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव काळे, कासा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या