Trending

6/recent/ticker-posts

पेण तालुक्यातील तरणाखोप येथील जमिनी संपादनाबाबत बैठक संपन्न 

पेण तालुक्यातील तरणाखोप येथील जमिनी संपादनाबाबत बैठक संपन्न पेण 
तालुक्यातील लघु पाटबंधारे मार्फत  हेटवणे धरणातूनपाणी कालव्यासाठी तरणाखोप येथील जमिनी संपादित करण्यात  आल्या होत्या संपादित  जमिनीतुन  कालवा गेला नाही ह्या बाबत शेतकरी ह्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डी बी पाटील साहेब ह्यांनी खासदार सुनील तटकरे व राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा ना आदितीताई तटकरे ह्यांना निवेदन दिले होते त्यानुसार मुबई मंत्रालय येथे खासदार सुनील तटकरे ह्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली 
ह्या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डी बी पाटील पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद भगत तरणाखोप गावचे ज्येष्ठ शेतकरी पांडुरंग गायकर प्रभाकर विठ्ठल पाटील युवा नेते प्रशात पाटील रघुनाथ फुंडे  पेण प्रांत प्रतिमा पुदलं वाड  हेटवणे  सिडको अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी शेतकरी ह्यांचे असणारे प्रश्न तातडीने लावण्यांचा सूचना खासदार सुनील तटकरे ह्यांनी दिल्या तसेच पेण तालुक्यातील रस्त्याच्या असणारे समस्या मार्गी लावणेसाठी  गडब डोलवी तरणाखोप बळवली खारपाडा येथील ग्रामस्थ यांनी निवेदन दिले. पनवेल इंदापूर चौपदरीकरण रस्ता रुंदीकरण बाबत खासदार सुनील तटकरे हे पेण तालुका हायवे पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले


Post a Comment

0 Comments