Trending

6/recent/ticker-posts

बाघबीळ ते गायमुख पर्यंतचे मेट्रोचे काम थांबवण्याची आमदार सरनाईक यांची मागणी

बाघबीळ ते गायमुख पर्यंतचे मेट्रोचे काम थांबवण्याची आमदार सरनाईक यांची मागणीठाणे मेट्रोचा भोंगळ कारभार  
ठाणे 
ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामाला सुरवात झाली त्यावेळी कासारवडवली, भाईंदर पाडा व गायमुख येथे उड्डाणपूल बांधून त्यावर मेट्रो पिलर उभारावे अशी विनंती मेट्रो प्रशासनाला आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. परंतु यांच्या मागणीचा विचार न करता मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बाबी लक्षात न घेता मेट्रोच्या कामाच्या  निविदांमध्ये उड्डाणपुलाचा अंतर्भाव न करता निविदा काढून कामाला सुरवात केली. त्यामुळे सरनाईक यांनी अर्थसंकल्पात आधी त्यासंदर्भात लक्षवेधी सुचना टाकली असता मेट्रोने आपली चुक कबुल करून त्या ठिकाणी उड्डाणपुल तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु एकदा मेट्रोच्या पिलरची उभारणी झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपुल कसे काय उभारणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. खरेतर नागपुर व मिरभाईंदरच्या धर्तीवर एलिवेटेड उड्डाणपुलाची गरज असताना परस्पर मेट्रोचे काम चालु करणे किती योग्य आहे असे प्रश्न घोडबंदर रोड वरील नागरिक करत आहेत . त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भात तक्रार केलेली असून या तिन्ही उडडाणपुलासह मेट्रोचे काम चालु करावे अशी विनंती केली आहे. जर हे काम सोबत झाले नाही तर घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी निर्माण झाली तर मेट्रो प्रशासनाला जबाबदार धरावे असे सरनाईक यांनी सांगितले आहे. 
घोडबंदर रॊडवरील मेट्रोच्या कास्टिंग यार्डच्या कामासाठी कोलशेत व हिरानंदानी येथील ज्या जमिनींचा वापर केला आहे. त्याच्या भाड्याबद्दल व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना मोबल्याबद्दल मात्र मेट्रो प्रशासनाने उत्तर देणे टाळले आहे. तसेच कासारवडवली येथील मेट्रोचे आरक्षण ज्या जमिनींवर टाकले गेले होते ती जमीन हरित पट्ट्यामधील असून त्यामधील काही जमिनी या आदिवासींच्या असल्याचे मेट्रो प्रशासनाला तब्बल ५ वर्षानंतर कळाले त्याबद्दल सरनाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले . ज्यावेळेस शासनातर्फे आरक्षण टाकले जाते त्यावेळेस त्या जमिनीच्या मालकीबाबत विचार करूनच आरक्षण टाकले जाते याचाच अर्थ मेट्रो प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची त्यावेळी चुकी झाली असल्याचे मेट्रो प्रशासनाने मान्य करावे तसेच मोघरपाडा येथील ज्या जमिनीवर मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकले जात आहे ती जमीन देशील हरित पट्ट्यामध्ये आहे. याचा मेट्रो प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाच्या उत्तरातून व कारभारातून मिळाले असल्याने सरनाईक यांनी खेद व्यक्त केला व याबाबतीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत एका बैठकीचे आयोजन करावे व तोपर्यंत बघबीळ ते गायमुख पर्यंतचे मेट्रोचे काम थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही सरनाईक यांनी केली आहे


Post a Comment

0 Comments