Top Post Ad

जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


ठाणे



जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे  एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन सदर  कारवाई केली आहे.
अरिहंत मॅट्रेसेस चे मालकांनी दि. 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘‘ arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli ( Furniture Market) Bhiwandi  या मथळयाखाली  जाहिरात दिली होती.  या  मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिध्द केली. तसेच सदर  मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली. सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र 166 भादवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि भाट करीत आहेत.


 


तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी


  देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ठाणे  जिल्ह्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणू (COVID-१९) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या इ.वर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची  विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इ. पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी दिले आहेत. सदर आदेश  बुधवार दि.18 मार्च 2020  पासुन तात्काळ लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था ,असंस्था, संघटना, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार, दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.


 


पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा, डान्सबार बंदीचे आदेश


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एकाठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचे  आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे मालिकांचे, जाहिरातींचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध अथवा संस्थेविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०(४५) यांच्या कलम १८८ शिक्षेस पात्र अपराध केला असे मान्य करून पुढील करवाई करण्यात येईल असे  नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com