Trending

6/recent/ticker-posts

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३१ जानेवारीपर्यंतची मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३१ जानेवारीपर्यंतची मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार नवी मुंबई 
नवी मुंबई महापालिका आरक्षण सोडतीत अनेक मातब्बरांचे आरक्षण महिलांसाठी आरक्षित झाले आहे.  १ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण सोडत घेण्यात आली. मात्र  प्रभाग आरक्षण व प्रारुप प्रभाग रचनेवर ५२४ हरकतींची नोंद करण्यात आली होती. त्याची सुनावणी झाल्यानंतर याबाबतची सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली होती.त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जैसे थे ठेवण्यात आले आहे. तर प्रभाग रचनेत काही ठिकाणच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले असून आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती     पालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रभाग निहाय मतदार यांद्यंकडे लागले आहे. निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. ३१ जानेवारीपर्यंतची यादीच ग्राह्य धरली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. 
नवी मुंबई महापालिका निवडणूकीत असलेल्या १११ प्रभागानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदारांच्या याद्यांमधील प्रभागनिहाय याद्य तयार करण्याचे अवघड काम सुरु करण्यात आले आहे. प्रभागनिहाय प्रारुप याद्य तयार केल्यानंतर  ९ मार्चला   या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय आणि  नवी मुंबई पालिकेतील संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई पालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येणार आहेत.प्रभागनिहाय करण्यात आलेल्या  प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे अनेकांचे लक्ष प्रभाग निहाय करण्यात येणारम्य़ा प्रारुप प्रभाग याद्यंकडे लागले आहे.कारण अनेक प्रभागनिहाय याद्य करताना अनेक मतदार हे दुसरम्य़ा  प्रभागांच्या मतदारयादीत गेल्याने गोंधळ उडतो.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदार मतदानासाठी एका केंद्रावर तर त्याचे नाव दुसरम्य़ाच प्रभागाच्या  यादीत असल्याचे  आढळून येते.त्यामुळे प्रभागनिहाय याद्यंकडे  विविध राजकीय पक्षांचे बारीक लक्ष असणार आहे.  २३ मार्चला  प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी तर २४ मार्चला  मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या