Top Post Ad

धर्मशास्त्रामुळे निर्माण झालेल्या भीतीतून "निती" निर्माण झालीच नाही.

धर्मशास्त्रामुळे निर्माण झालेल्या भीतीतून "निती" निर्माण झालीच नाही.



सतराव्या शतकात तुकारामांनी  "घोकाया अक्षर।,  मज नाही अधिकार।, सर्वभावे दीन ।  तुका म्हणे जातिहीन।''   ही व्यक्त केलेली खंत १९ व्या शतकात महात्मा फुलेंनी शूद्रातिशूद्रांसाठी व स्त्रियांसाठी शाळा काढून बहुजन समाजाचे भावविश्व बळकट केले. 
हा आमच्या आंदोलनाचा इतिहास लक्षात घेवून आम्ही निर्णय घेतले पाहिजे.  बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी ब्राह्मणी व्यवस्थे विरुद्ध लढा देणारे "भोजलिंग-नामदेव- तुकाराम" यांचेच ब्राह्मणीकरण केल्यामुळे आम्हाला आमचा इतिहास,आमची विचारधारा न समजल्यामुळे बहुजन समाजाची फार मोठी फसगत झाली आहे. "भोजलिंग-नामदेव-तुकाराम" यांनी सुरू केलेले आंदोलन बहुजन समाजाच्या "बौध्दीक" स्वातंत्र्याचे आंदोलन होते हे आम्हाला कधी कळू दिलेच नाही.
 भोजलिंग-नामदेव-तुकाराम यांच्या आंदोलनाचा आणि धार्मिकतेचा काहीही संबंध नसताना जोडला गेला आणि तेथूनच आमच्या भोवती "गुलामगिरीचे साखळदंड" घट्ट आवळल्या गेले. "हिंदुजनांचा हास आणि अध:पात'' या पुस्तकाच्या पृ. ७० वर बॅरीस्टर एस.जी.मुखर्जी लिहितात, “महाभारत काळापासून आमच्यात ज्या ज्या समाजधारेच्या संस्था उत्पन्न झाल्या, त्या सर्वाचा जन्म स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या पोटी न होता भीतीच्या पोटीच झालेला दिसून येतो. आमच्यातले व्यक्तित्व आणि स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी यांचे पार तळपट उडाले."   मूळ-निवासी बहुजन समाजाच्या ब्राह्मणी धर्मशास्त्राच्या भीतीचे दडपणच भोजलिंग-नामदेव-तुकाराम दूर करीत होते. कारण संतांना माहित होते की, भीतीतून "नीति" कधीच निर्माण होत नाही.
धर्मशास्त्रामुळे किंवा पोथी-पुराणांमुळे नीति निर्माण होते हे साफ चुकीचे आहे. धर्मशास्त्र आणि पोध्या पुराणांच्या माध्यमातून ब्राहणांनी बहुजन समाजात भीती निर्माण करून स्वत:चा फायदा करून घेतला . भोजलिंग-नामदेव-तुकारामानी भटी वर्चस्वाच्या बुरूजाला सुरूंग लावून भटांचा जुलूम आणि भटांची हरामखोरी चव्हाट्यावर आणली हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून "वारकरी संतांचे आंदोलन" भक्तिच्या पाकात घोळन-घोळून ब्राह्मणांनी संपविले. कळि काळाचं शीर फोडण्याचे सामर्थ्य असलेला "वारकरी" आज दैव-नशीबाच्या नावे बोटे मोडाताना दिसतो, हा वारकरी संतांच्या आंदोलनाचे ब्राह्मणीकरण झाल्याचा परिणाम आहे. वारकरी आंदोलनाचे ब्राह्मणीकरण होणे म्हणजे युक्तिच्या ऐवजी भक्तित रूपांतरित होणे होय..
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
अनिल सोमवंशी.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
निष्कर्ष - धर्मशास्रामुळे किंवा पोथीपुराणांमुळे "नीती" निर्माण होते हे साफ चुकीचे आहे.....
तात्पर्य-संताचे वारकरी हे मानवी-जीवनमूल्ये आधारीत समतेचे पुरोगामी आंदोलन समजून घ्या.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
भोजलिंग-तुकाराम.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com