Trending

6/recent/ticker-posts

महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणीठाणे 
ठाणे महापालिकेचे नेमके उत्पन्न किती, दरमहा खर्च किती, बँका व इतर वित्त संस्थांकडून घेतलेले कर्ज, कर्जासाठी महापालिकेला बंधनकारक असलेल्या अटी, कर्ज परतफेडीचा कालावधी, दरमहा कर्जापोटी जाणारा हप्ता आदींबाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी लवकरात लवकर आर्थिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, त्याचबरोबर ठाणेकरांच्या माथी मारलेले ‘सुटा बुटातील’ अनावश्यक प्रकल्प थांबवून काटकसरीचे उपाय योजावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेवर सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. जिल्ह्यात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली मानली जात असतानाच, वाढत्या कर्जाच्या बोजामुळे तिजोरीवर व पर्यायाने ठाणेकरांवर बोजा पडणार आहे. गेल्या काही वर्षांत महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून विविध मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले.सामान्य ठाणेकरांची गरजेएवढ्या व आवश्यक सुविधांची अपेक्षा असताना, महानगरपालिका प्रशासनाकडून स्मार्ट ठाण्याच्या नावाखाली ‘सुटा बुटातील’ प्रकल्प लादले गेले आहेत. या प्रकल्पांचा खर्च परवडण्याजोगा नसल्याचे स्पष्ट झाले आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरूच आहे. हा खर्च परवडणारा नाही. सद्यस्थितीत या प्रकल्पांचा आढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आगामी काळात आर्थिक स्थिती खालावल्यास, महापालिकेतील कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नसल्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. 


Post a Comment

0 Comments