Top Post Ad

मढी येथील कानिफनाथांचे समाधी स्पर्श दर्शनास स्थगिती

मढी येथील कानिफनाथांचे समाधी स्पर्श दर्शनास स्थगितीनगर


प.पू.कानिफनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मढी ( ता. पाथर्डी ) येथील परंपरागत कावड यात्रा व फुलबाग यात्रा रद्द करण्याचा व नाथांच्या समाधी स्पर्श दर्शनास तूर्त स्थगिती देण्याचा तसेच दैनंदिन अन्नछत्रही बंद ठेवण्याचा निर्णय कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि मढी ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे घेतला आहे. श्रीक्षेत्र मढी येथे परंपरेप्रमाणे यात्रा महोत्सवाचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. धार्मिक कार्यासाठी गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने पारित केलेल्या आदेश क्र.आव्यमपु/कार्या१९अ/१८८/२०२० शनिवार दि.१४ मार्च २०२० चा मान राखून श्रीक्षेत्र मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळाने श्रीकानिफनाथांच्या मुक्तव्दार समाधी दर्शनास म्हणजेच समाधी स्पर्श दर्शनास आणि दैनंदिन अन्नछत्र सेवेस पुढील शासकिय आदेश होईपर्यत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोना प्रतिबंधाची खबरदारी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये देवस्थान ट्रस्टने ग्रामपंचायत पदाधिका-यांशी व ग्रामस्थांशी चर्चा करून यात्रा महोत्सवातील हे निर्णय भाविक व ग्रामस्थांच्या हितासाठीच घेतले आहेत. महाराष्ट्रभरातून व महाराष्ट्राबाहेरून मढी येथे येणा-या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष श्री. सुनिलराव सानप, विश्वस्त श्री. आप्पासाहेब मरकड, श्री. मिलिंद चवंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अशोकराव पवार, व्यवस्थापक श्री.बाबासाहेब मरकड आणि सरपंच श्रीमती रखमाबाई मरकड व उपसरपंच सौ.मिनाताई आरोळे यांनी केले आहे.


 


-------------


तुळजाभवानी देवीचे दर्शन  17 मार्चपासून पुढील आदेश  येईपर्यंत बंदतुळजापूर: 


करोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन मंगळवार दिनांक 17 मार्चपासून पुढील आदेश  येईपर्यंत बंद करण्यात आले असल्याची माहिती  तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली. धार्मिक कार्यक्रम तसेच  इतर पूजा विधि नियमित पार पडणार असून फक्त दर्शन बंद करण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर  चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या पाच एप्रिल पासून चैत्र यात्रा सुरू होणार होती. या यात्रेला इतर राज्यातूनही लाखो भक्त येत असतात, त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं तहसीलदार योगिता कोल्हे म्हणाल्या.  सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने तुळजापूर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.यामुळे कुठल्याही व्हीआयपी व्यक्ती किंवा सामान्य नागरिकाला मंदिर दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.  देवीची पूजा ही मंदिराचे महंत व पाळीकर पुजारी करतील. मंदिरामध्ये ४ पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहू शकणार नाहीत. देवीचे दैनंदिन धार्मिक विधी भाविकांविना पार पडणार असून याचा मंदिर प्रशासनाला मोठा फटका देखील सहन करावा लागणार आहे.


------------


पहिल्यांदाच देऊळ बंद..,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..,


रायगड


कोरोना च्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.15) रात्री 8:30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिर निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे.
    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी 14 मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पाली, तालुका सुधागड बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी तसेच खालापूर तालुक्यातील इमॅजिका वॉटर पार्क 31 मार्च पर्यंत नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत.


 १८५६ पासून आतापर्यंत ३५० पितळेच्या बुद्धमूर्ती सापडलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टने ताबडतोब प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 15 मार्च रात्री पुढील सूचना मिळेपर्यंत बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप यांनी दिली. प्रशासनाने काढलेले आदेश सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी मंदिर ट्रस्टला दिल्यावर ताबडतोब ट्रस्टने खबरदारी घेऊन मंदिर बंद करण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केले.


----------------------


कोरोना मुळे महालक्ष्मी यात्रा रद्द
 वैशाख़ चैत्र पौर्णिमा पासून पुढे पंधरा ते वीस दिवस महालक्ष्मीची यात्रा दरवर्षी भरत असते. त्यासाठी भाविक मोठया संखेने येत असतात. परिसरातील सर्व स्थानिक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. यात्रा त्याच्या करिता पर्वणी असते.    ड़हानु ते मुंबई पर्यंतचे भाविक व खवय्ये ख़ास करून यात्रेतील भूजिंग  मुठीया खाण्याकारिता आवर्जुन भेट देतात. 
 परंतु यावर्षी  कोरोना भीतीमुळे शासनाने गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचे आदेश दिले असल्याने मंदिर प्रशासनाने देखिल याची दख़ल घेत या वर्षीची यात्रा रद्द केल्याचे समजते.


-----------------------------------------------------


 नवी दिल्ली


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे गर्दी टाळणे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन सर्वत्र करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. हा शुकशुकाट देवस्थान परिसरातही पाहायला मिळत आहे.


आंध्र प्रदेशात असलेल्या तिरुपती भगवान वेंकटेश्वर मंदिरातही याचा परिणाम दिसून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानने टोकण तत्त्वावर १७ मार्चला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी विरोध केला आहे.


तिरुमाला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या बाहेर, भक्तांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी रांगेत उभे राहण्यास नकार दिला गेला आहे. लोकांची संख्या नियमित करून सर्वांना वेळेनुसार दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे.


तिरुपती तिरुमाला देवस्थानचे सीईओ अनिल कुमार सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्राद्वारे टोकन बुक करू शकतात. टोकण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना निर्णयाला सहमती दर्शवून देण्यात आलेल्या वेळेतच दर्शन घेतले पाहिजे. जर तसे न केल्यास भाविकांना दर्शनासाठी दुसरी वेळ देण्यात येणार नाही. 


----------------------- 


प्रतिक्रिया


देऊळबंद


कोरोना मुळे आता मंदीर,मज्जिद,चर्च, गुरुद्वारा,प्रार्थनास्थळे, दरबार बंद पडले आहेत आणि केवळ दवाखाने उघडे आहेत.  आता शासनाला व लोकांना कळेल की गावात दवाखाना बांधायला हवा की मंदिर....आता तरी समाज मनाचे परिवर्तन होईल का? 


मुलांना योग्य शिक्षण देवून सुशिक्षित बनवायचे की आध्यात्म व अंधश्रध्देच्या नावावर पोटभरुंचे कारखाने चालू ठेवायचे?  


कोरोना कोणत्या एका विशिष्ट राशीला होणार नाहीय? 


कोणत्या नक्षत्रावर दूर होईल असे कोणी सांगणार नाहीये? 


कोरोनाचा रुग्ण कोणत्याही जागृत देवस्थानात बरा होणार नाहीये ? 


अंधश्रद्धेचे थोतांड माजविणा-यांनी आता तरी समजून घ्यायला हवे !


आता तरी शिका! संघटित व्हां! आणि विज्ञानाधिष्टीत संघर्ष करा!


                                                                      - मा.महेंद्र मोने : सामाजिक कार्यकर्ते:ठाणे


 


--------------


 


कसं काय ...❓ करोनाला माणुस घाबरला बघा.....


उठसुट मंदिर,मस्जिद,चर्चमध्ये जाणारा श्रध्दे च्या नावाखाली आतून मात्र भित्रा असणारा  माणूस आज कसा काय हतबल झाला....


33 कोटी देव पाठीशी असुन पण, शिर्डी,तिरुपती,वाराणसी सुनसान झाले....


एवढा मोठा शैतानाला संपवणार्या प्रेषीतांचा मक्का मदीना खाली झाले......
अवतारी येसुबाबा, रानबाबा,  मरीआई असुन, देउळ खाली झाले...
कदाचित नाही विश्वास म्हणुन दगडाच्या देवावर म्हणून हा माणूस ,जातोय विज्ञानाच्या इस्पितळात आणि आश्वस्त होतोय डाँक्टरांना पाहुन.....काय कामाचे पंडित पुजारी? 
कोठे गेले होमहवनवाले,
कोठे गेले सत्यनारायणवाले.
काय कामाचे मुल्ला,मौलवी ,पाद्री?


निसर्ग जेंव्हा मानवनिर्मित ढोंग सहन करू शकत नाही तेंव्हा तो करोना सारखा सूक्ष्मजीव देवून आपल्याला जमिनीवर आणतो. अन् मग सर्वानाच आठवण येते डॉक्टरांची, विज्ञानाची, मेडीकल सायन्सची........


दैववादी,श्रद्धाळू होण्यापेक्षा...  विज्ञानवादी, अभ्यासू व्हा...


--- रजनीकांत शिंदे


------------------------


 


कोण म्हणतंय भिऊ नकोस पाठीशी आहे ? ❓❓❓
जरा मागे वळून तरी पहा.आहे का कोण. 😜😜😜
अहो एवढ्याशा सर्दी पडशाला मंदिर,दर्गा,चर्च मधे जाणारा मानव आज अवसान गळून बसला आहे.तेहतीस कोटि देवांचा देश खचून गेला आहे.त्यांनी मानलेल्या देवाला म्हणजे त्या मूर्तींना ही आज ठिकठिकाणी 'मास्क' लावण्याचा खेळ सुरू आहे यातच सगळं आलं.'वो सब कुछ देखता है' असे जिथे श्रद्धा ओतली जाते तिथे 'सबुरी'च नसल्यामुळे ते पहायलाही कुणी थांबत नाही.इकडून तिकडून हात मारून कमाईतील टक्केवारी जिथे बिनबोभाट टाकली जाते त्या मंदिरातील हु़ंडीही रिकामी पडत चालल्यामुळे तिथेही आर्थिक मंदीची झळ पोहोचली आहे.बनारसचा बगीचा ओस पडला आहे.जिथल्या जनतेंनी डोक्यावर घेतले त्या जनतेच्या मनातील भीती ही उडवायला नरेंद्र भाई तिथे जायला तयार नाहीत.
शैतानाला गाडणारा मदीना, पापांचे क्षालन करणारी व्हॅटिकन सिटी सगळेच ओस पडले आहेत. 
भारतात बुवा,महाराज,अम्मा तम्मा, माता,बापू अशा नावांची बिनभांडवली शेती मोठ्या प्रमाणात करणारी मंडळीही आज भूमीगत झाली आहेत. त्या शेताच्या पिकात डोळे मिटून घुसणा-यांची इथे अजिबात कमतरता नाही.उलट असे लबाड लोकंच त्यांचा जयजयकार करण्यात धन्यता मानतात.आज जयजयकार करणारे ते भाट ही कुठे दिसत नाहीत.अशी लंपट लोकंच वर उल्लेख केलेल्या ठगांच्या कुकर्मांना विनाकारण अध्यात्माशी जोडून आपली दुकाने थाटतात ही वस्तुस्थिती आहे.
'जिथे विज्ञान थांबते तिथुन अध्यात्म सुरू होते' असे ही भाट मंडळी सतत आळवत असतात.अशा लोकांना आता जाहीर 'आव्हान' आहे. त्यानी आता ते स्विकारावे. आता जर विज्ञान थांबले आहे असे जर त्यांना वाटत असेल तर,मग त्यासाठी वर उल्लेख केलेल्या अध्यात्माचे घोडे नाचविणारे  सर्वांनी एकत्र येऊन सध्या जगात थैमान घातलेल्या 'कोरोना' वर इलाज करणे तर दूर राहू द्या.किमान भारतीयांना तरी याची लागण होऊ नये याची तजवीज करावी.
मंत्रतंत्र, होम-हवन, पूजापाठ करून संकटं दूर करावेत. सत्यनारायणाची कथा सांगत मंत्र तंत्राच्या जोरावर बुडणारी बोट पाण्याबाहेर निघाली असा दावा करणारे कथावाचक भटजी करोनाच्या भीतीनं कुठे गायब झाले आहेत ? जे काही करायचे ते मंत्र-जप त्यांनी खुशाल करावे, पण कोरोना व्हायरस नष्ट करून दाखवावे. अन्यथा विज्ञान कुठेच संपत नसून अध्यात्म सुरू होण्याचा प्रश्नच उदभवत नाही हे जाहीरपणे कबूल करावे.इतकेच✍🏽
अंधश्रद्धा भगाओ ! मानव धर्म बचाओ !!


---------------------------------------


 


 चिन जपान +आमेरीका मघ्ये या राष्टामध्ये लोक देवाना १,टक्काही मानत नाहीत ,म्हणुनच कोरोना सारखे आजाराला बळीपडतात,व मूत्यु देखील झालेले  आहेत  परंतु  या देशात का,बर शिर्डी देवस्थान , गजानन महाराज मंदीर , मंजीद व चेर्स मंदीरे बद-ं करत आहेत  व याञा बंदकरुन  देशातील लोकाचे काय होईल, त्याचे रक्षण कोन करेल , कोरोना जर घालवायचे आसेलतर , देशात हे देवस्थान आहेत , हेच मानसाचे संरक्षण  करतील ,त्या मुळे देव स्थानचे दर्शन घेणे गरजेचे आहे ,व आभिषेक कर्न गरजेच आहे ं जर खरच हे देवस्थाने ंमहाराष्ट़़ातील देवालय बंद करणे म्हजे देवापेक्षा का मोट सायन्स आहे ं सायन्स जर मोटे वाटत आसेल तर , देवालय बंदकरुन सांयन्स शिकवते , शासन , मग देवालयाची सपंती  ,सर्व  शाळा कॉलेज , व मेडीकल , कॉलेज 
 साटी का खर्च   करुनये , प्राण वाचवेल  ते मोटे , समजायला काही हारकत आहे का,मग सायन्स पेक्षा कोन्हीच मोटेनाही मग देवा धर्माचे नाव का घेता  घेयाचे आसेल तर , मग निवडणुकीतच धर्म जात ,लि़ंग आणी देवालयाचा उपयोग करा,ना,मि, भारतीय आहे, 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com