Top Post Ad

वर्तक नगर प्रभाग समिती समोर  मनसेसह रहिवाशांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

ठामपाचे कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर शिंदे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी 
वर्तक नगर प्रभाग समिती समोर  मनसेसह रहिवाशांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणठाणे
प्रभाग क्रमांक ०७ मधील साईनाथ नगर मधील ४० मी डिपी रोडचे आरक्षण आहे  त्याजागी बृहमुंबई महानगरपालिकेची  जुनी पाईप लाईन काढून टाकण्यात आली, त्यामुळे मोकळ्या झालेल्या साईनाथ नगर मधील मधील दुर्गा देवी मंदिरा समोर, उजव्या व डाव्या बाजूस पत्र्याच्या १० झोपडया बांधण्यात आल्या आहेत 8त्याच्या बाजूस महावितरणची चालू स्थितीत असलेली विद्युत पेटी  आहे त्याचा विद्युत प्रवाहामुळे आजूबाजूस राहणाऱ्या नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे  दररोज भांडण तंटा होत असून आजूबाजूस राहणाऱ्या नागरीकास खूप मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्ता व्यापला गेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे तसेच झोपड्याच्या आता झाड आहेत  त्या झोपड्याना कर सुदधा आकारला आहे याची तक्रार यापूर्वी वर्तक नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांसाकडे दिनांक २७ जानेवारी २०२० रोजी  तक्रार केली होती परंतु अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही  यामुळे त्वरित हे बांधकाम निष्कासन करावे संबंधित व्यक्तीवर एम आर टि पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता स्थानिक नागरींक व महाराष्ट्र नवनिर्माण सेना निखिल जाधव ( उप विभाग अध्यक्ष ) अक्षय आंबेरकर ( उप शाखा अध्यक्ष ) सुनील राजगुरू ( गट अध्यक्ष )  कृष्णा  काटमे , सचिन बेलोसे यांच्यासह अनेक रहिवाशांनी ५ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण  वर्तक नगर  प्रभाग समिती समोर  करणार आहे 
 संबंधित वर्तक नगर प्रभाग समिती मधील प्रभाकर शिंदे (कार्यालयीन अधीक्षक ) अतिक्रमण निष्कांसन विभाग मधील संबंधित जबाबदार अधिकारी कर्तव्य पालनात कसूर केल्याबाबत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . पूर्वी माजिवडा प्रभाग समिती मध्ये कर भरणा करण्याचे काम करीत होते त्याने कर स्वरूपात गोळा झालेले अडीच लाख रुपये घेऊन स्वतःसाठी वापरले व त्यानंतर ते गैरहजर होते त्यांच्यावर केस नंबर यु एल पी 44 अनव्ये गुन्हा दाखल आहे त्यानंतर चौकशी चालू आहे या कारणास्तव या भ्रष्टाचारी माणसाला क्लार्क पदावरून थेट वर्तक नगर प्रभाग समिती येथील खातेप्रमुख या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आता त्यांच्याकडे चार महत्त्वाच पाणी, कर, अतिक्रमण, लेखापाल, खाते आहेत म्हणजेच चोराच्या हाती  तिजोरीची  किल्ली देण्यासारखे आहे. त्यानंतर दिनांक 17 ,5, 2018 रोजी कार्यालयीन आदेशानुसार लोकमान्य प्रभाग समिती मध्ये बदली करण्यात आली होती परंतु ते अद्याप तेथे हजर झाले नाहीत त्यांना सहाय्यक आयुक्त व राजकीय लोकांचा पाठबळ असल्यामुळे हे करीत असल्याचा आरोप मनसेने केले आहे. 
मुबई महानगर पालिकेने काढून टाकलेल्या जलवाहिणीच्या जागेवर लोकांनी झोपड्या बांधल्यावर पहिल्या वेळेस तोडण्यात येतात त्यानंतर झोपडी मालकास वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयात बोलवण्यात येते त्यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर तोडलेल्या झोपडीवर कर आकारण्यात येतो प्रत्येक झोपडी मागे 50 ते 60 हजार रु असा दर आहे काही झोपड्याच्या आत झाडे आहेत त्यामुळे हळूहळू प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे  ४० मी डीपी रोड साठी आरक्षित असलेल्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केल जात आहे त्यास जाबाबदार चारुशीला पंडित - (सहायय्क आयुक्त) प्रभाकर शिंदे ( कार्यालयीन अधीक्षक) आहेत, असा स्पष्ट आरोप निखिल जाधव - उप विभाग अध्यक्ष मनसे  यांनी केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com