कोव्हीड-१९: लॉकडाउनमध्ये मदतीसाठी झूमकारचा पुढाकार
~बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील व्यावसायिक आदींना देत आहे सेवा
मुंबई
भारतातील लॉकडाऊनच्या कालावधीत उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठे सेल्फड्राइव्ह मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या झूमकारने आता वेगाने पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकारने शटडाऊनचे आदेश दिल्यानंतर झूमकारने कामाला गती दिली असून ही कंपनी बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील व्यावसायिक, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज यांचा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी निवडक वाहनांचा वापर करत आहे.
झूमकार विविध संस्थांशी भागीदारी करत आहे. या संस्थांमधील नोकरदारांना प्रवासाचा हा सुरक्षित पर्याय आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी हे करार महत्त्वाचे ठरत आहेत. भागीदारीतील या संस्थांसाठी या कारच्या सेवेद्वारे एखाद्या व्यक्तीला बोलावून घेणे, अशा संकट समयी दररोज सेवा देणे आणि नागरिकांना आपत्कालीन गरजांमध्ये येणारे अडथळे कमी होत आहेत.
झूमकारचे सीईओ आणि सहसंस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले, 'या आव्हानात्मक काळावर मात करण्यासाठी झूमकार सुरक्षित प्रवासाची हमी देत वैयक्तिक आणि पूर्णपणे जंतू विरहीत केलेले सेल्फड्राइव्ह व्हेइकल पुरवते. सरकारी कर्मचायांपासून आरोग्य सेवेतील कर्मचा-यांपर्यंत आम्हाला विविध आपत्कालीन क्षेत्रातील लोकांकडून अशा वाहनांची मागणी येत आहे. या अनपेक्षित वादळात देशाची मदत करण्याकरिता आम्ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर सेल्फड्राइव्ह मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवण्याचा अखंडपणे प्रयत्न करू.’
कार पूर्णपणे जंतू विरहीत तसेच अतिशय स्वच्छ करून झूमकार कारसाठी १००% की लेस अॅक्सेस देखील पुरवते. त्यामुळे इतर कुणाही माणसाची मदत न घेता ग्राहक झूमकारची वाहने वापरू शकतात.
0 टिप्पण्या