Top Post Ad

उरणमधील बेलडोंगरीची दोन दिवसांत राख

उरणमधील बेलडोंगरीची दोन दिवसांत राखउरण : 
सिमेंटच्या जंगलवाढीकरिता नैसर्गिक जंगलांना जाणीव पूर्वक आगी लावण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. तसेच  शिकारी वा जंगलात लाकूडफाटा जमा होण्याच्या उद्देशाने देखील काही अज्ञात व्यक्ती सायंकाळी आगी लावत आहेत. त्यामुळे जंगलातील निसर्ग संपदा धोक्यात आली आहे. अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जंगलांमध्ये धुमसत असलेल्या आगी या मानवनिर्मित असल्याचा आरोप केला आहे. त्या दृष्टीने वन विभाग उपाययोजना करीत असले  तरी , अद्यापी या आगी आटोक्यात आल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार असल्याची शंका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. 
उरण तालुक्यात निसर्गाचा समतोल काही जंगले महत्त्वाची आहेत. त्यातील काही वन्यजीव टिकून राहण्याचीही आवश्यकता आहे. परंतु,  उरण परिसरातील जंगलांना आगी लावण्याचे प्रकार पुन्हा घडू लागले आहेत. दोन दिवसांपासून चिरनेरमधील बेलडोंगरी जंगलात आग धुमसत आहे. या आगींमुळे जंगलातील वन्यजीवांना धोका वाढला असून हिरवाई नटलेले डोंगरातील वनसंपदेची राख झाली आहे. वनसंपदा टिकविण्यासाठी सरकारी पातळीवर गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नसल्याची टीका येथील काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे.
जंगलांना लावल्या जात असलेल्या आगी आटोक्यात आणल्या जात नाहीत, तोवर हा नाश होतच राहणार आहे. वनसंपदा नष्ट होत असल्याने वन्यजीवांचा अधिवासच धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यामुळे मानवी आणि वन्यप्राण्यांच्या संघर्षांत भर पडली आहे. काही वेळेला नागरी वा ग्रामीण वस्तीत सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. यात काही वेळेला मृत्यूही ओढवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चिरनेर, तसेच येथील पूर्व विभागात थोडय़ा फार प्रमाणात जंगल शिल्लक आहेत. या जंगलात असलेले अनेक पक्षी, प्राणी यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. मात्र, मानवनिर्मित आगी वन विभागाने गांभीर्याने न घेतल्यास उरणच्या जंगलांमधील वन्यजीवांचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणवादी कार्यकर्ते जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com