कुठे आहे जातीयवाद ? असं विचारणाऱ्या सर्व धर्म समभाव सांगणाऱ्या गँगला समर्पित !
१.अवंतिका - मृणाल कुलकर्णी
२.आभाळमाया - सुकन्या कुलकर्णी - मोने
३.अधुरी एक कहाणी- किशोरी गोडबोले
४.अवघाचि हा संसार - अमृता सुभाष
५.अस्मिता - मयुरी वाघ
६.असे हे कन्यादान - मधुरा देशपांडे
७.असंभव - उर्मिला कानेटकर
८.अजूनही चांदरात आहे - नेहा गद्रे
९.अग्गंबाई सासुबाई - निवेदिता जोशी सराफ
१०.उंच माझा झोका - स्पृहा जोशी
११.एका लग्नाची दुसरी गोष्ट - मुक्ता बर्वे
१२.एका लग्नाची तिसरी गोष्ट - स्पृहा जोशी
१३.कळत नकळत - रुजूता देशमुख
१४. कुलवधू - पूर्वा गोखले, सई रानडे
१५.कुंकू - मृन्मयी देशपांडे
१६.काहे दिया परदेस - सायली संजीव
१७.का रे दुरावा - सुरुची आडारकर
१८.गुंतता र्हदय हे - मृणाल कुलकर्णी
१९.जय मल्हार - सुरभी हांडे, ईशा केसकर
२०.जागो मोहन प्यारे - श्रृती मराठे
२१.जुळून येती रेशीमगाठी - प्राजक्ता माळी
२२.तुझ्यात जीव रंगला - अक्षया देवधर
२३.तुला पाहते रे - गायत्री दातार
२४.तुझं माझं ब्रेकअप - केतकी चितळे
२५.दिल दोस्ती दुनियादारी - सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोम्बरे
२६.नांदा सौख्यभरे - रुतुजा बागवे
२७.भाग्यलक्ष्मी - नेहा पेंडसे
२८.मला सासू हवी - आसावरी जोशी
२९.माझा होशील का - गौतमी देशपांडे
३०.माझ्या नवऱ्याची बायको - अनिता दाते केळकर
३१.माझिया प्रियाला प्रीत... मृणाल दुसानीस
३२.राधा ही बावरी - श्रृती मराठे
३३.या सुखांनो या - ऐश्वर्या नारकर
३४.लज्जा - गिरीजा ओक गोडबोले
३५.वादळवाट- आदिती सारंगधर
३६.शुभंकरोति - प्रिया बापट
३७.शेजारी शेजारी - शिवानी रांगोळे
३८.होणार सून मी या घरची - तेजश्री प्रधान
३८ पैकी पाच आडनावं बिगर ब्राम्हणी आहेत.ती अशी - माळी, बागवे, देशमुख, रांगोळे, ढेंबरे (अमृता सुभाष यांचं आडनावं जे त्या लावत नाहीत.) उर्वरित नावांमध्ये बहुतांश ब्राम्हण आणि काही सीकेपी नि सारस्वत आहेत.)
आता ही जी अपवादात्मक पाच नावं आहेत, त्यापैकी देशमुख, बागवे, ढेंबरे, रांगोळे मराठा आडनावं आहेत. (यातलं कुणी एखादं अपवादाने बिगरमराठा असू शकतं) माळी हे एकच आडनाव ओबीसी असण्याची शक्यता आहे. यात दलित, आदिवासी अभिनेत्री शून्य. ब्राम्हणेतर आडनावं ३८ पैकी ५ म्हणजे १३ टक्के आहेत, (त्या पाचापैकी चारही पुन्हा उच्चजातीय - मराठा आहेत) ३८ पैकी १ माळी हे नाव ओबीसी आहे, असं समजल्यास, बहुजन नायिकांचं प्रमाण २ टक्के इतकं आहे. यातून झी मराठीवरील मालिकांत दलित, आदिवासी नट्यांचं नायिका म्हणून प्रमाण शून्य टक्के आहे, ब्राम्हण नायिकांचं ८७ टक्के, १२ टक्के इतर उच्चजातीय जसं की मराठा वगेरे, आणि १ टक्का ओबीसी (शक्यता फक्त)
१.अवंतिका - संदीप कुलकर्णी
२.आभाळमाया - मनोज जोशी, संजय मोने
३.अधुरी एक कहाणी- स्वप्नील जोशी
४.अवघाचि हा संसार - प्रसाद ओक
५.अस्मिता - पियुष रानडे
६.असे हे कन्यादान - प्रसाद जवादे
७.असंभव - उमेश कामत
८.अजूनही चांदरात आहे - नकुल घाणेकर
९.अग्गंबाई सासुबाई - डॉ. गिरीश ओक
१०.उंच माझा झोका - विक्रम गायकवाड
११.एका लग्नाची दुसरी गोष्ट - स्वप्नील जोशी
१२.एका लग्नाची तिसरी गोष्ट - उमेश कामत
१३.कळत नकळत - अनिकेत विश्वासराव, सुबोध भावे, सुनील बर्वे
१४. कुलवधू - सुबोध भावे
१५.कुंकू - सुनील बर्वे
१६.काहे दिया परदेस - रिषी सक्सेना
१७.का रे दुरावा - सुयश टिळक
१८.गुंतता र्हदय हे - संदीप कुलकर्णी
१९.जय मल्हार - देवदत्त नागे
२०.जागो मोहन प्यारे - अतुल परचुरे
२१.जुळून येती रेशीमगाठी - ललित प्रभाकर
२२.तुझ्यात जीव रंगला - हार्दिक जोशी
२३.तुला पाहते रे - सुबोध भावे
२४.तुझं माझं ब्रेकअप - सायंकित कामत
२५.दिल दोस्ती दुनियादारी - सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर
२६.नांदा सौख्यभरे - चिन्मय उद्गीरकर
२७.भाग्यलक्ष्मी - (नाव कळू शकलं नाही)
२८.मला सासू हवी - आनंद अभ्यंकर (अपघाती मृत्यूनंतर रिप्लेसमेंट - राजन भिसे)
२९.माझा होशील का - विराजस कुलकर्णी
३०.माझ्या नवऱ्याची बायको - अभिजीत खांडकेकर, अद्वैत दादरकर
३१.माझिया प्रियाला प्रीत कळेना - अभिजीत खांडकेकर
३२.राधा ही बावरी - सौरभ गोखले
३३.या सुखांनो या - विक्रम गोखले, राजन भिसे, अभिजीत केळकर
३४.लज्जा - लोकेश गुप्ते
३५.वादळवाट- अरुण नलावडे, लोकेश गुप्ते, उमेश कामत, प्रसाद ओक
३६.शुभंकरोति - उमेश कामत
३७.शेजारी शेजारी - आनंद इंगळे, वैभव मांगले
३८.होणार सून मी या घरची - शशांक केतकर
या ५१ नायकांपैकी इंगळे, मांगले, नलावडे, गायकवाड, भिसे, उद्गगीरकर, नागे, जवादे ८ नावं ब्राम्हणेतर कलाकारांची आहेत, म्हणजे १५ टक्के. त्यातही गायकवाड आणि इंगळे ही दोनच नावं दलित असण्याची शक्यता आहे (बहुधा नसावेत, ही दोन्ही आडनावं मराठा जातीतही येतात) समजा ही दोन नावं दलित असतील, झी मराठीवरील मालिकांत नायक म्हणून दलित नटांचा सहभाग ३ टक्के इतका आहे.
आणखी काही सॅम्पल्स घेतल्यास, वेगळ्या वाहिन्यांची उदाहरणं घेतल्यास या आकडेवारीत पाच ते दहा किंवा क्वचित पंधरा - वीस टक्क्यांचा फरक पडू शकतो. त्यातल्या त्यात स्टार प्रवाह आणि कलर्स मराठीवरील मालिकांत अलीकडे बहुजन आणि हुशार अशा नवोदित चेहऱ्यांना चांगली संधी मिळते आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे, तरीही मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या बहुजन नट-नट्यांची संख्या वीस टक्क्याच्या पुढे जाणार नाही. तेव्हा सुजय डहाकेचं निरिक्षण अगदी बरोबर आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ब्राम्हणांचा पगडा नव्हे तर चांगलं वर्चस्व आहे.
आता मुद्दा इतकाच आहे की, मला काही यातल्या ब्राम्हण कलाकारांबद्दल तिरस्कार नाही, अनेकांच्या कामाचं कौतुकच वाटतं उलट. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक अशी कितीतरी मंडळी त्यात आहेत. मुद्दा त्यांचा दुस्वास करण्याचा नाही, पण इतरांना का संधी मिळत नाही ? हा आहे. याचा अर्थ एकतर हे लॉबिंग मजबूत आहे, किंवा ब्राम्हणी कलाकारांची जेवढी संख्या आहे ( ८५ ते ९५ टक्के) तेवढ्या प्रमाणात बहुजन मुला-मुलींमध्ये टॅलेंट नसावं. आणि समजा दलित - बहुजन मुला-मुलींमध्ये टॅलेंट नसलं तरी त्यात त्यांचा दोष नाही, जे गुणवत्तेचा मुद्दा तुमच्या तोंडावर नाचवतात ते सामाजिक - सांस्कृतिकदृष्ट्या भांडवलदार असतात. कारण ब्राम्हण म्हणून जन्माला आल्यावर तुम्हाला जे सोशियो-कल्चरल कॅपिटल फक्त जन्मानेच मिळतं, इतरांना ते मिळणं तर दूर पण भाकरी आणि शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागतो. तेव्हा चार - दोन बहुजन नावं फेकून मारतील लोक तोंडावर, त्याने खुश होऊ नका, काही अप्रस्थापितांना अपवादात्मक संधी तर कोणत्याही फिल्डला द्यावीच लागते, नाहीतर ते सर्वसामावेशक आहेत, असा भास कसा निर्माण होणार?
-- ट्रोलिंगच्या भितीने कुठेही न टाकली गेलेली एका तरुण लेखिकेची पोस्ट :
----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया.................
ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेने केलेल्या वक्तव्यानंतर कलाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
कलाविश्वात जातीयवाद आताचा नाही. फार वर्षांपासून या जातीयवादाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. ही खरंच चिंतेची बाब आहे. मात्र आपण काहीच करु शकत नाही, असं विक्रम गोखले म्हणाले.
सिनेसृष्टीमध्ये मी कधीही जातीयवाद अनुभवला नाही किंबहुना माझ्या सहकार्यांसोबतही असं झाल्याचं माझ्या लक्षात नाही, असंही विक्रम गोखले यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, विक्रम गोखले लवकरच ते ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
----------------------------------
#_ब्राम्हण_अभिनेत्रिंनाच_म
हे वाक्य आहे प्रतिभावंत, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुजय सुनील डहाके यांचं..!!
#_सुजयच्या_या_वक्तव्याचं_म
या वक्तव्यावर ब्राम्हणी वर्चस्व असलेली मिडिया सुजय वर अनेक प्रकारच्या टिका करतांना दिसते.... अनेक सवर्ण कलाकारांनी यावर "कलेला जात नसते" अशी प्रतिक्रिया दिली.
हे खरं आहे की कलेला जात नसते....पण........
मग हिच कला महाराष्ट्राची शान असलेल्या "तमाशात", सुधारणावादी/विद्रोही नाटकांमध्ये "ब्राम्हण" का दाखवत नाहीत?????
तमाशाला/लावणीला सवर्ण नेहमीच हिनतेचा दर्जा देत आलेत.......या उलट तमाशाप्रधान चित्रपटांमध्ये "ब्राम्हण"स्त्रि-पुरूष विशेषतः स्त्रिया आवर्जून आणि तेही मुख्य भूमिका करतांना दिसतात,,,,,याचे कारण म्हणजे ""पैसा""..,,
""जिथे पैसा तिथे ब्राम्हण""असाच याचा अर्थ होतो.!!
तमाशात कलेची कमी असते काय???तर नाही कमी असते ती""मिळणाऱ्या पैशाची"".,,म्हणून सवर्ण तमाशाला नेहमीच खालचा दर्जा देत आलेत.
आज मराठी चित्रपटसृष्टीत/मालिकेत इ. क्षेत्रात ९०ते९५% लोक"ब्राम्हण" आहेत...याचा अर्थ इतर जातींतील कलाकार कलेत कमी पडतात असा होत नाही,,,मग असे असताना ठराविक लोकांचीच मक्तेदारी येथे का चालते???
सुजय डहाकेने आपल्या आतली खदखद निर्भयपणे व्यक्त केली त्याबद्दल त्याचं अभिनंदन..!!
(वैयक्तिक पोस्ट)
-----------Sunilkumar Namdev
बहुजन हे टिव्ही सिरीयल पाहण्यात कसे गुंतले पाहिजे . आणि बहुजनातील महिला ही या टिव्ही सिरीयल पाहण्यातच स्वतःला धन्यता मानतात.
आज घडीला सर्व टिव्हीच्या चँनलवर ज्या मालिका चालु आहेत त्यामध्ये
1) एकीचा नवरा दुसरयाच्या बायकोबरोबर फिरत असतो (माझ्या नवरयाची बायको )
2) लग्न झालेल्या मुलाची आई दुसरयाबरोबर लग्न करते (अग्गबाई सासुबाई)
3) प्रेम करणे आणि तीला सोडुन देणे किंवा त्याला सोडुन देणे ( तुझ माझ ब्रेकअप)
4) मोलकरीण बरोबर प्रेम करणे ( जागो मोहन प्यारे )
आणि ईतर सिरीयल मध्ये प्रेम ,घटस्फोट,अनैतिक सबंध, देव आणि अंधश्रध्दा पसरवणारे असेच दाखवले जाते आणि हे आपल्या बहुजन समाज संध्याकाळी 6 ते 7 ला चालु होतो टीव्ही तो रात्री 11 ते 12 पर्यत तेच चालु असते,
लहान मुलासमोर काय पाहिले पाहिजे ,याचे भान ही आपल्याला नसते. आणि हेच 3 टक्के वाल्याचे कार्यक्रम आपण मोठ्या आवडीने पाहतो.,
शेकडो बहुजन कलाकार आहे पण त्यांना सिरीयल मध्ये मुख्य भुमिका दिल्या जात नाही.
या सिरीयल पाहण्यात आपण इतका वेळ घालवतो .
कधी आपण बाबासाहेब आंबेडकर स्टार प्रवाह वरील मालिका सहकुटुंब पाहतो का ?
कधी आपण महात्मा फुले यांच्या वरील सिरीयल सहकुटुंब पाहतो का ?
कधी आपण सहकुटुंब बसुन आपल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचतो का ?
कधी आपण महापुरुषांनी केलेल्या कार्यावर सहकुटुंब चर्चा करत असतो का ?
याचे उत्तर आपण आपलेच शोधले पाहिजे .
अजुन ही वेळ गेली नाही.आपली लोकसंख्या खुप आहे तरी ही मारवाड्याच्या दुकानातुनच महिन्याचा बाजार भरत असतो .
हे व्यापारी आणि हे ब्राम्हण्य माननारे लोक कधीच बहुजन समाज्यासाठी उपयोगी पडणार नाही .आपण आपल्याला सपोर्ट केला पाहिजे .नाहीतर हे सिरीयल च्या माध्यमातुन आपल्याला असे गुतवुन ठेवतील कि तुम्ही डिस्टेशन कँम्प मध्ये कधी जाईल हे सुध्दा कळणार नाही वेळीच सावध व्हा आणि या सिरियल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानकाळात हे सरकार बहुजन विरोधी कोणते कायदे आणतात ते समजुन घ्या संविधान विरोधी कसे कायदे करतात ते समजुन घ्या त्या कायद्याचा विरोध करा
आपलाच
यश भालेराव
9067047333
0 टिप्पण्या