Top Post Ad

बहुजन नायक कांशीरामजी

द ग्रेट लीडर कांशीराम     तथागत  बुद्ध याचे "बहुजन हिताय बहुजन सुखाय " आणि  डॉ.बाबासाहेब याचे Educate , Agitate, Orgnaze या विचारक्रांतीने  १५ टक्के विरूद्ध ८५ टक्के बहुजन समाजात आत्मविश्वासाने सत्तापरिवर्तन घडविणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब याचा १५ मार्च हा जन्मदिन" बहुजन समाज दीन "साजरा होत आहे. विशवभूषण डॉ.बाबासाहेबाच्या नंतर देश विदेशात जयंती साजरी होण्याचे भाग्य मान्यवर कांशीरामजीना लाभले .तरीही  उत्तर प्रदेश राजकिय अभ्यासक प्रा. बद्री नारायण याचे ‘कांशीराम – लीडर ऑफ द दलित्स’ हे चरित्र काहीसे बुचकळ्यात टाकणारे आहे कारण मान्यवर कांशीरामजी  यांनी उतरपदेश मधील आंबेडकरी चळवळीत दलाल नव्हे तर अनेक लाल पेदा केले आहेत.
        "द ग्रेट लीडर कांशीराम" हा सिनेमा गरीब कुठुबातील २४ वर्षीय तरुण अर्जुन शिंहने  अनेक अडचणीवर मत करून  बनविला.सुरुवातीला  सर्वांनीच आर्थिक सहकार्याचे  आश्वासन दिले. पण प्रत्यक्ष तशी  मदत झालीच  नाही.तेव्हा  त्याच्या  आईने आपली  जमीन विकून मुलास २५ लाख रुपये दिले.पत्नी अर्चना शिहने आपले  सर्व दागिने विकून दीड लाखाची मदत केली . बामसेफच्या  कार्यकर्त्यांनी ३ लाखाची मदत केली.अश्याप्रकरे अर्जुन शिंह यांनी " द ग्रेट लीडर कांशीराम" हा सिनेमा पूर्ण केला. आजही एका मास लीडरच्या  सिनेमाला अव्हढे दिव्य  करावे लागत असेल .तर  "द ग्रेट लीडर  मान्यवर कांशीरामजी "कोणत्या अग्नीदिव्यातून गेले असतील.? याची  कल्पनाही करता येत नाही.       
    मान्यवर कांशीरामजीनी बहुजन वर्गाला सत्ताधारी करण्यासाठी स्वतःवर पाच बंधने  आजन्म   लादून   घेतली होती.  सरकारी अधिकारीची नोकरी सोडून  पहिली प्रतिज्ञा घेतली की,"मी आजीवन नोकरी करणार नाहीं."दुसरी प्रतिज्ञा" मी आजीवन अविवाहित राहीन."तिसरी प्रतिज्ञा" "मी आजीवन माझ्या जन्मघरी जाणार नाही. त्यानव  भेटणार नाहीं" .चौथी  प्रतिज्ञा" मी आयुष्यात स्वतःसाठी   धनसंपती जमा  करणार नाही.आणि "पाचवी   प्रतिज्ञा" मी आजीवन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाईन."बोले तैसा चाले त्याची व वंदवी पाऊले!"  कांशीराम जीनी परिवर्तन चळवळीसाठी जीवन  समर्पित करने त्याग नव्हे. काय?
       बाबा तेरा मशीन अधुरा ,     कांशीराम करेगा पुरा!"
    ६ डिसेंबर १९८१ रोजी  डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनी कांशीरामजीनी "दलित शोषित समाज संघर्ष समिती" (डिएस -4) ची स्थापना करून "ब्राम्हण,ठाकूर, बनिया चोर, बाकी सभी डिएस-फोर "अशी केलेले  आक्रमक घोषणा ही सत्तेवर असलेल्या वर्णवर्चस्ववादी जातींना एक आव्हान होते.  १४ एप्रिल १९८४ रोजी डॉ.बाबासाहेब जयंती दिनी   बहुजन समाज पक्षाची स्थापना केली."जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी "! या घोषणेतून त्यांनी उच्चवर्णिय सत्तेवर आपला दावा दाखल केला होता.
      डॉ.बाबासाहेब यांनी  मूकनायक, बहिष्कृत भारत , जनता , समता आणि  प्रबुद्ध भारत  ही वृत्तपत्र सुरू केली.तर  कांशीरामजीनी "दि ओप्रेस्ड इंडियन, बहुजन नायक, बहुजन टाइम्स आदि वृत्तपत्र सुरू केली.  मान्यवर कांशीरामजीनी  बाबासाहेबा सारखी ड्रेस,भाषा या शैलीची कधीच नक्कल केली कारण ते डॉ.बाबासाहेब यांना आपला नेता आणि आपण त्याचा कार्यकर्ता मानत होते. सर्वसामान्य नेता असलेले  कांशिरामजीना  राजकीय "फटीचर" म्हणणारा  कॉंग्रेस नेता राजेश पायलटला  एकदा  उत्तरप्रदेशातील राजकीय घडामोडीसाठी कांशीरामजीकडे जावे लागले . तेव्हा साहेब म्हणाले अरे तू तो "फटीचर " के पास क्या मागणे आया है! त्यावेळी राजेश  पायलट शर्मिंद्ये झाले होते.
     बी एस पी म्हणजे भिंतीवरचा पक्ष असेच लोक  म्हणत होते. कांशीरामजीनी त्याच पक्षाला   देशातील तिसऱ्या क्रमाकचा  राष्ट्रीय पक्ष बनविला."कॉंग्रेस हे जळत घर असून.त्याच्या वळचणीला ही उभा राहणार नसल्याची बाबासाहेनाची घोषणा होती.कांशीराम साहेबांनी  उत्तरप्रदेशच्या राजकारणात   एस सी/ एस टी / ओबीसीची  मोठं बांधून बसपा ,समाजवादी पक्षाची युती करून  मायावतीना  चार वेळा मुख्यमंत्री करून  कॉंग्रेसला  उत्तरप्रदेश मधून हद्दपार केले. तेथूनच भारतवर्षात कॉंग्रेसला राजकीय उतरती कळा लागली हे मान्य करावे लागेल. २००७ साली बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता प्राप्त झाली.
      अटलबिहारी वाजपेयीनी कांशीरामजीकडे  राष्ट्रपती पदाचा   प्रस्ताव ठेवला .कांशीरामजीनी त्याला  ठोकर मारून म्हणाले "मला राष्ट्रपती नव्हे तर या देशाचे पंतप्रधान बनावयाचे आहे. परिवर्तनवादी सत्ता ही बहुजनांच्या दरात आली पाहिजे हा माझा  ध्यास आहे. बसपाचां प्रधानमंत्री होणार हा त्याना आत्मविश्वास होता.  एके काळी उत्तरप्रदेशात दलीत फुलनदेविची नग्न धिंड काढली.  त्याच उत्तरप्रदेशची बहन मायावती यांना चार वेळ मुख्यमंत्री बनविले.  राजू भय्या सारख्या नामचीन गुंडाला जेलमध्ये टाकून उत्तरप्रदेश भयमुक्त  केला . सामाजिक समता आली  असली तरी  आर्थिक विषमता कायम राहिली.
          पुरोगामी महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षाची सत्ता यावी  ही कंशिरामजीची फार इच्छा होती .कारण त्याने  देशाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते.परंतु महाराष्ट्रात जेव्हढा मोठा जयभीम तेव्हढा नेता आणि कार्यकर्ता कुणाचातरी चमचा म्हणून कांशिरमजीनी चमचा युग हे पुस्तक लिहिले.परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आपल्या पुढच्या पिढीला आपण बहुरंगी सांस्कृतिक जीवन देणार आहोत की एकरंगी जगणं? लोकशाहीत भारत की हिंदुस्थान ? यांत निवड  कोणाची करावी ही वेळ आली तरी महाराष्ट् मधील  नेत्याची मनुवादी पक्षाशी आतून आणि बाहेरून चमचेगिरी करण्याची स्पर्धा सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com