Trending

6/recent/ticker-posts

३ मार्च रोजी विधानसभेवर उपेक्षित समूहांचा सत्याग्रह

एनआरसी, एनपीआर, सीएए आणि ईव्हीएम विरोधात उपेक्षित समूहांचा सत्याग्रह मुंबई
देशातील  आदिवासी,भटके विमुक्त,सर्व तऱ्हेचे मागासवर्गीय,शोषित,उपेक्षित समूह अशा तमाम भारतीयांच्या नागरिकत्वावर उठलेल्या एनआरसी,एनपीआर आणि सीएए कायदा आणि प्रक्रियेला  संवैधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी येत्या ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता विधानसभेवर " उपेक्षित समूहांचा सत्याग्रह''आयोजित करण्यात आला आहे. उपेक्षित समूहांसोबत काम करणाऱ्या व्यक्ति तसेच पक्ष-संघटना आणि अशा समूहांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात सामील व्हावं असं आवाहन सत्याग्रहाचे निमंत्रक ज्योती बडेकर (जनता दल,सेक्युलर),रवि भिलाणे (लोकांचे दोस्त)आणि धनंजय शिंदे(आम आदमी पक्ष)यांनी केलं आहे.
महाराष्ट्र सरकारने विधानसभेत एनआरसी,एनपीआर,सीएए आणि ईव्हीएम विरोधी ठराव मंजूर करावा अशी या सत्याग्रहाची प्रमुख मागणी आहे.या सत्याग्रहात लोकांचे दोस्त,जनता दल (सेक्युलर),आम आदमी पक्ष, भूमिसेना,महाराष्ट्र आदिवासी मंच, श्रमिक मुक्ती आंदोलन,कष्टकरी शेतकरी संघटना,लोकधारा (नॅशनल अलायन्स फॉर नोमॅडीक,सेमी नोमॅडीक अँड डीनोटिफाईड ट्राईब्स,महाराष्ट्र ), भटक्या विमुक्त जमाती संघटना,आगरी युवक संघटना,महाराष्ट्र राज्य घर कामगार यूनियन,कष्टकरी समाज संघ (घरकामगार/कचरावेचक), अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस,भारतीय सेवा नाका कामगार संघटना,कष्टकरी घरकामगर संघटना,इंडियन सोशल मुव्हमेंट,मराठी भारती, विद्यार्थी भारती,नदिफ-पिंजारी जमात, अन्सारी-जुलाहा जमात, बागबान जमात, इद्रिसी जमात,जमियते कुरेश,वाघिणी,वडार समाज संघटना (जोगेश्वरी),पोतराज समाज (कुर्ला) आदी पक्ष संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
        डॉ.जी.जी.पारीख (९५ वर्षांचे स्वातंत्र्यसेनानी ),माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,आमदार विद्याताई चव्हाण,प्रभाकर नारकर,कष्टकरी समाजाचे नेते विठ्ठल लाड,लोकशाहीर संभाजी भगत,ऍड.पल्लवी रेणके,शिवश्री अकिफ दफेदार,आरिफ मन्सूरी, मुशीर अन्सारी, गोविंद भगत, रामराजे अत्राम, एस.ए.बागबान सर, नबी इद्रिसी, सलीम कुरेशी,मानवाधिकार कार्यकर्ते जावेद आनंद आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
           सत्याग्रहाच्या आयोजनात संध्या पानस्कर, ऍड.चित्रा गोसावी,,दैवशाला गिरी,संजीवनी नांगरे,रंजना आठवले,ममता अढांगळे,सुनंदा नेवसे,संगीता मालशे, ऍड.पूजा बडेकर, ऍड.शिल्पा सावंत,मीना लाहिरी,कल्पना गावडे,मधुताई बिरमोळे,विजेता भोनकर,दीपा घायतडक,कवयित्री छाया कोरेगावकर,कविता सूर्यवंशी,जयश्री घाडी,ललिता आखाडे,मंजिरी धुरी,संजय शिंदे,शशी सोनावणे,ज्ञानेश पाटील,भरत वायेडा,काशीनाथ निकाळजे,उदय रसाळ,बाळासाहेब उमप,प्रशांत राणे,संदेश गायकवाड,विनायक साळुंखे,भानुदास धुरी ,श्रीनिवास देवरुखकर,मूलनिवासी माला,सुभाष हणमंते,डॉ.जगदीश लांबे,प्रदीप सूर्यवंशी,सुनील खुराडे आदींनी पुढाकार घेतला आहे. अशी माहिती निमंत्रक ज्योती बडेकर (जनता दल,सेक्युलर) :9588685638,   रवि भिलाणे (लोकांचे दोस्त ): 9892069941, धनंजय शिंदे (आम आदमी पक्ष):9867693588 यांनी दिली आहेPost a Comment

0 Comments