Trending

6/recent/ticker-posts

बाहेरून आलेले लोक सुद्धा आपलेच आहेत... त्यांच्याशी भेदभाव नको

बाहेरून आलेले लोक सुद्धा आपलेच आहेत... त्यांच्याशी भेदभाव नको
मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहनमुंबई
सोशल मीडियावर सुद्धा विविध प्रकारच्या चर्चा उठल्या आहेत. अमुक देशातून हजारो लोक येणार, संकट वाढणार असे मेसेज पाठवले जात आहेत. परंतु, येणारे लोक सुद्धा आपलेच आहेत, महाराष्ट्रातील आहेत हे विसरू नका. ते देखील राज्यातील कुणाचे तरी भाऊ, बहीण, मुलं, आई-वडील, काका, मामा आणि आजोबा असे नातेवाइक आहेत. त्यांच्याशी भेदभाव करू नका. सिंगापूरमध्ये काही भारतीय अडकले आहेत. त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना आणण्याची सुविधा करण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. ते आल्यानंतर त्यांना वेगळे करून चाचण्या घेतल्या जातील. आवश्यकता वाटल्यास क्वारंटाइन केले जाईल. सर्वच उपायांचा सरकाकडून विचार केला जात आहे. सोबतच, कुणीही आपली ट्रॅव्हेल हिस्ट्री लपवू नये. ट्रॅव्हेल हिस्ट्री लपवणारे काही गुन्हेगार नाहीत. पण, हे लपविणे चुकीचे आहे. तुमच्यामुळे इतरांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरानाशी युद्ध करत असताना ज्या-ज्या सूचना केल्या जात आहेत त्यांचे पालन केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. हे एक युद्ध आहे आणि शिवरायाच्या लढवय्या महाराष्ट्रात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाचा नायनाट करू असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यासोबतच, राज्य सरकारकडून सर्वच प्रकारच्या उपाय-योजना केल्या जात आहेत. तसेच केंद्राकडून सुद्धा पाहिजे ती मदत मिळत आहे. साधन सामुग्री आणि जीवनावश्यक वस्तूंसह कुठल्याही गोष्टींचा महाराष्ट्रात तुटवडा नाही. त्यामुळे, कुणीही घाबरू नये आणि लढवय्यांप्रमाणे लढणाऱ्या डॉक्टर, प्रशासनाला घरीच राहून सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे की अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळा. अनेक धार्मिक स्थळांवर गर्दी कमी झाली आहे. सरकारच्या सूचनांचे सर्व धार्मिक स्थळांकडून पालन केले जात आहे. यात्रा आणि जत्रा रद्द केल्या जात आहेत. तरीही काही लोक अनावश्यक प्रवास करताना रेल्वे आणि बसमध्ये दिसून येत आहेत. ही गर्दी सुद्धा ओसरली पाहिजे. सरकारने आपल्या कामकाजात 50 टक्के कर्मचारी राहतील अशी व्यवस्था केली आहे. दिवस आणि आठवड्यांचे नियोजन करण्यावर सुद्धा विचार सुरू आहे. आपल्याकडे सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. काळजी करू नका असे मी सांगणार नाही. तरीही आपल्याकडे बहुतांश रुग्ण बाहेरून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात येऊन कोरोना झालेले लोक खूप कमी आहेत. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद म्हटले आहे.
कोरोनाशी युद्ध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1965 आणि 1971 च्या युद्धाची आठवण करून दिली. युद्धाचा काळ खूप वाइट असतो. परंतु, काही सूचनांचे पालन करावेच लागते. आम्ही लहान असताना 1971 चे युद्ध झाले तेव्हा मुंबईपर्यंत शत्रूंचे लढाऊ विमाने आली होती. संध्याकाळ झाली की सायरन वाजायचे. लोक आप-आपल्या घरातील पलंग, टेबल आणि आडोशाखाली लपायचे. खिडक्यांना कागदे लावून झाकले जायचे. संध्याकाळ होण्यापूर्वीच लाइट बंद केले जायचे. आम्हालाही या सगळ्या गोष्टी मुळीच आवडत नव्हत्या. परंतु, युद्धाच्या परिस्थितीत आपल्याच संरक्षणासाठी या गोष्टी कराव्या लागल्या.
1971 च्या युद्धाप्रमाणेच आजही सायरन वाजले आहे. पण हे युद्ध एका वेगळ्या अर्थाने आहे. वॉर अगेंस्ट व्हायरस असे मुख्यमंत्र्यांनी याला नाव दिले आहे. सीएम म्हणाले, "या काळात सर्वांनी सरकारने दिलेल्या सूचना पाळा हीच एक विनंती आहे. ज्या प्रमाणे युद्धात सैनिक आपले सर्वस्वी पणाला लावून आपल्यासाठी जीव धोक्यात टाकतात. तसेच आज घडीला डॉक्टर, नर्स, स्टाफ आणि प्रशासनाने आपले कुटुंब आणि जीवाची परवा न करता 24 तास ड्युटी सुरू केली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी एवढेच करा. आप-आपल्या घरातच राहा. त्यांना यातून खूप मोठी मदत होईल.


Post a Comment

0 Comments