Top Post Ad

प्रादेशिक मनोरुग्णालयाची दैनंदिन स्वच्छता ऐरणीवर 

प्रादेशिक मनोरुग्णालयाची दैनंदिन स्वच्छता ऐरणीवर 



ठाणे 
कंत्राटी सफाई कामगारांना मागील १० ते १२ वर्षे पगारवाढ झालेली नाही. तसेच आहे तो पगारही वेळेवर हाती पडत नाही. या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य विविध १६ मागण्यांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या माध्यमातून दिल्याने रुग्णालयाची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता ऐरणीवर आली आहे. 
उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या ठाणे शहराध्यक्षा सोनी चौहान यांच्या नेतृत्वाखाली मनोरुग्णालयातील ३५ महिलांसह ५५ पुरुष कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळी कामगार वेळेवर रुग्णालयात आले. मात्र, त्यांनी रुग्णालयाबाहेर बसून कामबंद आंदोलन सुरू केले. पुणे येथील मनोरुग्णालयातील कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये पगार मिळत आहे. पण, ठाण्यातील कामगारांना आठ हजार पगारही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वाल्मीकी सफाई कामगारांना शासन परिपत्रकाप्रमाणे पगार मिळावा, कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे घरभाडे मिळावे, वर्षाला दोन गणवेश मिळावे, पगार १ ते १० तारखेदरम्यान मिळावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे, उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांना संघटनेने दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com