Top Post Ad

अखेर वंचितचे राजाभाऊ चव्हाण यांचे उपोषण मागे

अखेर वंचितचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांचे उपोषण मागे
चर्मकार समाज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंदोरीकरबुवांनी मागितली माफी 



ठाणे 


 भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी आणि चर्मकार समाज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. मात्र, सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी ५ मार्च पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाची दखल घेत इंदोरीकर बुवांचे प्रतिनिधी अॅड शिवलीकर यांची उपोषणस्थळी भेट घेऊन  सायगाव ता. येवले जिल्हा नाशिक येथे  विशेष कीर्तन आयोजित करून जाहीर माफी मागितली असल्याचे सांगितले. अखंड हरीनाम सपताह सोयगाव ता.येवला येथील कीर्तन रूपी सेवेत महाराजांची सर्व जाती धर्मातील सुतार,लोहार,चर्मकार दलित,व सर्व समाजातील विविध अठरा पगडी जातीतील बंधू, भगिनी, तरूण तरूणी महीला, विविध संघटना,याच्या विषयी अनावधानाने भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो. असे इंदोरीकर बुवा म्हणाले. 
  http / m. facebook. com / story. php  story fbid=2766417530116524 id1000002449110032 and sfnsn = wiwspwa  extid=mk85t4RYMRDGRENo and=w and vh=I "r .या लिंकवरील निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आरक्षणावरुन दिशाभुल करणारे किर्तन इंदोरीकर हे करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ते म्हणतात की अरे जाती-बिती सरकारने काढल्या. सुताराला घर फुकाट द्या मराठयाचं पाडून टाका. चांभाराचं साहेब करुन टाका मराठयाचा वरातीला सोडा. नाचू द्या. आख्खी रात... नोकरीला गेल्यावर त्याची जात पहा... नोकरीला गेल्यावर पहिली काय पाहता? जात.. अन् आपल्याला नाव काय दिलंय सरकारनं खुला.. जन्माला आल्यावर खुला.. मरताना खुला मध्ये बी खुला... ज्याला जमिन नाही त्याला पाईन लाईन, ज्याला विहीर नाही त्याला मोटार, आपण खुला! तमच्या जातीचा मिळाल्यावर आमचा घरी डांबता, पण तर तरी घ्याल का नाही? अशी विधाने करतानाच अश्लील शिवीदेखील दिली आहे.  इंदोरीकर यांच्या या विधानामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. चांभाराला साहेब करा.. हे विधान करत असतांनाच मराठा समाजाला चर्मकारांच्या पोलीस ठाणे अंमलदार वर्तकनगर पोलीस ठाणे ’विरोधात चिथावणा देण्याचा प्रयत्न इंदोरीकर यांनी केला आहे, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली.
या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अ‍ॅट्रोसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले 29 फेब्रुवारी रोजी दिले होते. मात्र, सहा दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या निषेधार्थ राजाभाऊ चव्हाण यांनी सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा इंदोरीकर प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com