Top Post Ad

सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता नाहीच - अॅड. प्रकाश आंबेडकर 

सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता नाहीच - अॅड. प्रकाश आंबेडकर 



पंढरपूर
सोलापूर लोकसभेचे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकीची पाच वर्षे न्यायालयीन लढाईत जाईल, असे सांगत सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता वंचित बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  फेटाळली. तसेच दिल्लीतील दंगलीमागे आरएसएस असल्याचा खळबळजनक आरोप करतानाच दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला दंगलीचं स्वरुप प्राप्त झालं. अशा दंगली पुन्हा झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, एका अहवालानुसार २५ लाख सैनिकांचे गणवेश विकण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. नाभिक समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
राज्यातील मंत्र्यांना ही गावरान सत्ता वाटते. त्यामुळे त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काळजीचं कारण नसल्याची विधानं करायला सुरुवात केली आहे. या मंत्र्यांना हे प्रश्न केंद्राचे आहेत आणि यात राज्य काही करू शकत नाही, हे वायफळ विधानं करण्यापूर्वी समजून घ्यायला हवं, असा टोला लगावतानाच सत्तेशिवाय जगू न शकणारी ही मंडळी प्रश्नाचं गांभीर्य घालवत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत अपुऱ्या माहितीच्या आधारे राज्यातील मंत्री वायफळ बडबड करत आहेत. त्यांची ही विधाने अडचणीची असून नागरिकत्व गेल्यावर एक दिवस लोकच या मंत्र्यांच्यापाठी दगडं घेऊन लागतील, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
सीएएचा कोणताही धोका नसल्याचं इतर मागासवर्गीय समाजाला सांगितले जात आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बाहेरील देशातील नागरिकांना हाकलल्यावर त्यांची मालमत्ता इतर मागासवर्गात वाटून दिली जाणार असल्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सीएए कायद्याची सत्य माहिती समजावी म्हणून इत्तर मागासातील लहान-लहान जातींचे मेळावे व बैठक घेण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com