Top Post Ad

त्या २७ गांव परिसरांमध्ये पालिका अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याची मागणी

त्या २७ गांव परिसरांमध्ये पालिका अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याची मागणीकल्याण
कल्याण डोंबिवलीतील २७ गावांची स्वतंत्रनगरपालिका करण्यासाठी प्रशासन पुन्हा आक्रमक भूमिका घेत आहे. या स्वतंत्र नगरपालिकेबाबत नागरिकांचा प्रचंड  विरोध आहे. येथील गावकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना महापालिकेचा अनुभव फारसा चांगला नाही. या महापालिकेतील अधिकाराव कर्मचारी हे ९९% भ्रष्टाचारी असून, गेल्या पाच वर्षातील आमचा अनुभव पाहता या परिसरात कोणत्याही प्रकारचे विकासात्मक कार्य महापालिकेकडून करण्यात आले नाही. या उलट दिवसागणीक या परिसरातील नागरीकांना नागरी सुविधा पुरविण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. विकासाच्या नावाखाली अनावश्यक प्रस्ताव, रस्ता रुंदीकरणाचा धाक दाखविला जात असल्याचे आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष तसेच कल्याण पंचायत समिती सदस्य सुधीर वंडारशेठ पाटील यांनी पत्राद्वारे केला आहे. 
नगरपालिकेच्या माध्यमातून  मलिदा लाटण्याचा घाट घातला जात आहे. या परिसरातील वॉर्ड अधिकारी हे २७ गावांतील भुमिपुत्राना व होतकर युवकांना नाहक त्रास देण्यासाठी त्यांची चालू असलेली बांधकामे ताडण्यासाठी भिती दाखवून त्यांच्याकडून मोठया प्रमाणावर पैशाची मागणी करीत आहेत. या अधिकाऱ्यांना भूमिपुत्रांनी पैसे दिले नाही तर ते पोलिसांची धमकी दाखवून बांधकामांवर तोडक कार्यवाही करतात आणि पून्हा पैशांची मागणी पूर्ण करुन सेटलमेंट करीत असतात. निवडून आलेले लोक-प्रतिनिधी आणि वॉर्ड अधिकारी यांमध्ये येथील स्थानीक युवक दिशाहीन होण्याच्या मार्गावर असुन, येथील भुमिपुत्र व स्थानिक युवक रोजगारापासून भरकटण्याच्या मार्गावर आहेत. 
यापुढे हे अधिकारी २७ गावामध्ये कोणतेही बांधकाम किंवा बांधकाम व्यावसायीकांना त्रास देण्यासाठी आले, तर त्या अधिका-यांना त्याची जागा दाखवुन त्याला वठणीवर आणण्याचे काम आमच्या राष्ट्रवादीमार्फत करण्यात येईल. तसेच त्यांचा तोंडाला काळे फासण्याची कार्यवाही देखिल करण्यात येईल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण पुरवू नये. अन्यथा कायुद्रा व्यवस्थेचा प्रश्न उभल्यास त्यास महापालिका अधिकारी जबाबदार राहतील. असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष तसेच कल्याण पंचायत समिती सदस्य सुधीर वंडारशेठ पाटील यांनी पत्राद्वारे केलेआहे. 
क.डो.म.पा.क्षेत्रातील २७ गांवे महापालिकेत समाविष्ठ न करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या गावातील जनतेसोबत गहन विरोध होत आहे. त्याच बरोबर या गावामध्ये पक्षाने आपले उमेदवार देखिल महापालिकेच्या जागेवर विधानसभा निवडणकीमध्ये उमेदवारही उभे केले नाही. परतु तात्कालीन राज्य शासनाने या गावातील जनतेची फसवणूक करुन निवडणूका लादून येथील नागरीकांची फसवणूकच केली आहे. गावे महापालिकेतून वगळण्याबाबत  वेळोवेळी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करुन. शिष्टमंडळामार्फत  तात्कालीन मुख्यमंत्री यांनी आश्वासन देवुनही आपला शब्द पाळला नाही. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेसतर्फे अनेक आंदोलने आणि रास्ता रोको टेखिल केले. शिवाय तात्कालीन मा मुख्यमंत्री महोदय याना काळे झंडे देखिल दाखविले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com