`ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे'
ठाणे
ठाण्यातील २५ लाख रहिवाशांना दररोज वाहतूककोंडीचा फटका बसतो. मात्र, याबाबत राज्य सरकार व महापालिकेची यंत्रणा ढिम्म आहे. त्यावर भाजपा ठाणेने `ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे' लोकअभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे कोंडीतून दिलासा मिळविण्यासाठी लढा उभारला जातोय, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाययोजना खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा यांच्या नेत्तृत्वा खाली केली जात आहे. तरी यामध्ये ठाणेकरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोंकण पदवीधर मतदारसंघ आमदार आणि भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी केले आहे.
यात प्रमुख तीन मागण्या आहेत.
१. ठाण्यातील मेट्रो - कोपरी रेल्वे पूलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करा.
२. पर्यायी मार्गांचा विकास (रस्ते,जलवाहतूक, रेल्वे)
३. ठाणेकरांना टोल मुक्ती द्यावी.
तुमचा एक मिस कॉल तुम्हाला `ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे' लोकअभियानातं सहभागी करेल.
चला तर मग आपण 08045936077 या क्रमांकावर मिस कॉल करुन आपल्या ठाण्याला ट्रॅफिक मुक्त करूया.
0 टिप्पण्या