Top Post Ad

दोन अत्याधुनिक वाहनांच्या साहाय्याने ठाणे शहराचे निर्जंतुकीकरण

अहमदाबादहून मागविली वाहने
आज १४ हजार ४०० लिटरची फवारणी



 
ठाणे


ठाणे शहरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी प्रभावीपणे करता यावी यासाठी महापालिकेने अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागविण्यात आली असून आता महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या यंत्रणेबरोबरच या वाहनाच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान आज १४४० लिटर हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास १४ हजार लिटरची फवारणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ हजार लिटर  हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास ४० हजार लिटरची फवारणी करण्यात आली आहे. 


        वागळे इस्टेटमधील युपीएल लि. या कंपनीने विनामूल्य ही वाहने उपलब्ध करून दिली असून  या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी 40 फुटाच्या रस्त्याची फवारणी करता येवू शकते. या वाहनाची गतीही पाच मिनिटाला एक किमी एवढी असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रफळामध्ये फवारणी करता येणार आहे. ही दोन वाहने शहराच्या विविध भागामध्ये फवारणी करतील. त्याचबरोबर या वाहनांसोबत 10 ट्रॅक्टर्स, 10 टँकर्स, 10 बोलेरो, 5 टाटा एस आणि 125 हातपंपाच्या माध्यमातूनही फवारणी करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांवर या दोन वाहनांच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येणार असून छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून छोट्या वाहनांचा वापर करून फवारणी करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com