Top Post Ad

 स्टॉक मार्केटची गती मंदावली

१.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये मोठ्या घोषणांची कमतरता; स्टॉक मार्केटची गती मंदावली
( श्री. अमर देव सिंह, एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सलाहकार )  


निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हीतही आज फार गती दिसून आली नाही. त्यांच्या आशियाई समकक्षांनी या आठवड्याची घोडदौड थोडी वरील अंकावर थांबवली. स्टॉक मार्केटने थोडा वेगळा कल दर्शवला. निफ्टी ५० ने सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली आणि मार्केट बंद होताना ०.२२ %पर्यंत त्यात वाढ दिसून आली. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स मात्र आज ०.४४ अंकांनी घसरला.
आरबीआयच्या पतधोरणाचे बँकांच्या समभागावर परिणाम
३ महिन्याच्या मोरॅटोरिअम कालावधीसह आरबीआयच्या चलनविषयक धोरणात जाहीर केलेल्या सवलतींमुळे मंदावलेल्या बाजाराला थोडा आधार मिळाला. निफ्टी बँक आज २०,००० ची पातळी गाठू शकली. बंद होताना ती १९,९६९ अंकांवर होती. यात आजच्या दिवशी बंधन बँकेंने १५.७५% नी वाढ घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. फेडरल बँक ६.३४%, अॅक्सिस बँक ५.३७% आणि आयडीएफसी फर्स्ट बँक २.९९% ने वाढ घेतली. इंडसइंड बँकेने काल ४६% च्या आसपास होती, ती आज ५.६९% नी सुधारीत स्थितीत आली.  आरबीएल आणि बँक ऑफ बडोदानेही जवळपास ३% घसरण अनुभवली.
टॉप परफॉर्मर्स:
बीएसईच्या बेंचमार्क निर्देशांकानुसार सेन्सेक्समध्ये १३ अंकांची प्रगती तर १७ अंकांची घसरण दिसून आली. अॅक्सिस बँक, आयटीसी, एनटीपीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या हे टॉप परफॉर्मन्समध्ये होते. अॅक्सिस बँकेने ४.९८%, आयटीसीने ३.६३% आणि एनटीपीसीने ३.१७% ची बढत घेतली. ऊर्जाक्षेत्रातही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम आहे. एनटीपीसी ३.१७% आणि पावर ग्रिड ०.८८ %नी पुढे होते. तर दुसरीकडे एनएसईमध्ये कोल इंडियानेही ६.८६% ची बढत घेतली.
टॉप लूझर्स:
ऑटोमोबाइल क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर विक्री दिसून आली. बीएसईमध्ये हिरो मोटोकॉर्प ८.०४% नी घसरला. तर मारुती सुझूकी आणि बजाज ऑटोदेखील दबावाखाली होता. एचसीएल टेक आणि टेक महिंद्रादेखील ४.३७% आणि २.३६% नी पडला. निफ्टीमध्ये बजाज फायनान्स आज ९ % नी गडगडला . हिरो मोटोकॉर्पदेखील ७.८१% नी घसरला आणि बजाज फिनसर्व्ह ४.९९% नी खाली आला.
गुंतवणूकदारांची माघार ताण वाढवणारी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील पेच कायम आहे. केंद्रीय बँकांनी केलेल्या उपाययोजनांचे परिणाम दिसेपर्यंत बराच वेळ लागेल. तसेच उच्च स्तरावर विक्रीचा दबाव येऊ शकतो. सध्याच्या घडीला ग्राहकोपयोगी तसेच फार्मास्युटिकल स्टॉकला धरून राहणे, हाच योग्य उपाय आहे.


 


-- For further information: Tushar Chavan 9004056574, Value360 Communications


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com