Top Post Ad

महाराष्ट्र  राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या प्रभारींनी घेतला ठामपाच्या कामकाजाचा आढावा

महाराष्ट्र  राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या प्रभारींनी घेतला ठामपाच्या कामकाजाचा आढावा



ठाणे : 
 ठाणे महापालिकेने  समान काम समान वेतन हे धोरण पालिकेने स्वीकारले आहे, मात्र त्यातील वेतनाचा फरक अद्याप कामगारांना मिळालेला नाही ,समान काम समान वेतन हे धोरण पालिकेने स्वीकारले आहे मात्र त्यातील वेतनाचा फरक अद्याप कामगारांना मिळालेला नाही , वर्षांनुवर्षे पालिकेच्या सेवेत सफाई कर्मचारी काम करतात. ठाणे पालिकेने समान काम, सामान वेतन स्वीकारले मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या धुलाई भात्यात  याचा फरक दिसून येत नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या धुलाई भात्यात  २०० रुपयांवरून ३५० रुपये करा. तसेच पालिकेच्या  सुख सुविधा द्या अशा सूचना महाराष्ट्र  राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष  मुकेशजी सोनू सारवान यांनी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात केल्या. यावेळी  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सारवान  हे ठाणे जिल्ह्याच्या  दौऱ्यावर होते. त्यांनी ११ मार्च रोजी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
ठाणे पालिकेच्या कामकाजावर बोलताना ते पुढे म्हणाले ज्या प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला त्या प्रमाणात सफाई कामगारांच्या सुट्ट्या वाढवण्यात याव्यात , वेळेचे प्रमाण दिवाळी बोनस ठेकेदाराकडे कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना अधिकृत क्रमांक मिळावा , त्याची नोंद महापालिकेकडे करण्यात यावी आणि त्याच्या वेतन पावतीवर पीएफ क्रमांक ,कामगार क्रमांक टाकण्यात यावा  , परिवार आरोग्य विमाची वाढ पगाराची तारीख  ठरवण्यात यावी त्याच तारखेला पगार देण्यात यावा, कंत्राटी कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी अटी शर्थी  ठरवण्यात याव्यात, पालिकेत रिक्त जागा भरावयाच्या आहेत. त्या अद्याप भरलेल्या नाहीत, तसेच पालिकेच्या सेवेत अनुकंपा तत्वावर असलेले कर्मचारी याना सेवेत कायस्वरूपी सामावून घ्या, तसेच पालिकेच्या सेवेत स्थायी आणि अस्थायी  सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे याची पालिकेने नोंद घेऊन आकृतिबंधानुसार कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून  अशा विविध मागण्या यावेळी सारवान यांच्यामाध्यमातून करण्यात आल्या. पालिका सफाई कर्मचाऱ्यांना  जो धुलाई भत्ता महिन्याला अवघ्या २०० रुपये दिला जातात चपला बुटे गणवेश इतर सामुग्री पावसाळी सामुग्री तो अपुरा असून त्यात वाढ करण्यात यावी असे  निर्देश सारवान यांनी पालिका प्रशासना दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com