दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने पोस्टमनना टोपी,टॉवेल मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेली २५ वर्षे सातत्याने हा उपक्रम चालू आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट, मुख्य पोस्ट ऑ फिस या पोस्ट ऑफिसमध्ये दरवार्षि पोस्टमनना टोपी वाटप केले जाते. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विलास ठुसे यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळी उपशहरप्रमुख जगदिश थोरात, उपविभागप्रमुख बाळा गवस, नाना येवले, सुरेश जैन, अविनाश दुराफे यांच्या हस्ते पोस्टमनना टोपी वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण भोगल, विनायक हळदणकर, यांनी मेहनत घेतली.
........ छाया : आदित्य देवकर.
0 टिप्पण्या