Top Post Ad

व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश



ठाणे: 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कलम 188 नूसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.  याबाबत १९ मार्च रोजी टाउन पोलीस स्टेशन येथे ठाण्यातील स्टेशन रोड येथील व्यापारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ३ दिवस आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. 
जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकानं आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकानं, व्यावसायिक आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरू ठेवण्यात येतील. 2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.  4. शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. 5. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com