Top Post Ad

पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधान

पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन - पंतप्रधाननवी दिल्ली 
जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे.  कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे  पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे मोदी म्हणाले.  कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेशी संवाद साधला.
प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे.काही देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. त्या देशातील नागरिक अनेक आठवडे घराबाहेर पडले नाहीत. या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन केलं. त्यामुळे आपल्या समोर फक्त हा एकच मार्ग आहे असं समजलं पाहिजे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर याची सायकल तोडणे गरजेचे आहे. काही लोकांमध्ये गैरसमज आहे की, सोशल डिस्टनींग हे फक्त आजारी माणसांसाठी तर सामान्य व्यक्तीपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनिवार्य आहे.काही लोकांच्या चुकीच्या विचारामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी याचा मोठा धोका आहे. जर असाच बेजबाबदारपणा सुरु राहिला तर तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहेत. लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संकटाची ही वेळ गरिबांसाठी कठीण आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
 कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com