Top Post Ad

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक 

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक मुंबई 
जेव्हापासून महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तेव्हापासून शासन आणि प्रशासन अतिशय गंभीर होऊन काम करत आहे. मग त्यामध्ये हॉस्पिटलमधली परिस्थिती, डॉक्टरांना सूचना, रूग्णालयात काय हवं नको, रूग्णांच्या अडचणी याकडे जातीने लक्ष देण्याचं काम मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री करत आहेत.  महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये यासाठी  सरकार आणि प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे. सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये घबराट आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज पत्रकार परिषद घेऊन सद्यपरिस्थिती नेमकी काय आहे? काय उपाययोजना केल्या जात आहेत?नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे? याची माहिती दोन्ही नेते सातत्याने देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या तसंच आरोग्य आणि पोलिसांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. यामध्ये शासन महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. तसंच या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती माध्यमांना समोर जाऊन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री देत आहेत.  एकंदरितच काळजी करू नका मात्र काळजी घ्या, हा संदेश देत महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचं काम मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री करत आहेत. 


--------------------


प्रतिक्रिया


कोरोनाचा अभ्यास केला जाईल,,,,,,,,, त्यानंतर उपाययोजना ठरवल्या जातील.......... अशी आश्वासनं न देता प्रत्यक्षात नागरिकांना विश्वासात घेऊन धीर देणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचा चेहराच खूप काही सांगत आहे.
--  अरुणा नारायण गायकवाड (वडाळा पूर्व)


 


 


मित्रांनो , आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांचा  अभिमान बाळगा. 


तुम्ही  काहीही म्हणा हो..देव म्हणा ,दानव म्हणा. पण मानवसेवेच व्रत हाती घेतलेला वृत्तस्थ गृहस्थी असतो हे आतातरी विसरू नका.....


आज रात्रीपासून भारतात येण्यासाठी visa बंद केला जातोय, पंतप्रधान सर्व मंत्री यांचे विदेश दौरे स्थगित ,सर्व सेमिनार बंद ,आज नाही तर उद्या शाळा बंद, ऑफिसेस बंद,घरातून ऑफिसची काम केली जातील. मॉल्स रिकामे पडले आहेतच, ठरवलेले कार्यक्रम रद्द होताहेत,सणावाराला उत्सवावर बंधन आणली जात आहेत, विमान कंपन्या उड्डाण रद्द करतायेत, अर्थव्यवस्था जमिनीवर आलेली आहे, सेन्सेक्स कधी नव्हे इतका कोसळलेला आहे, एवढेच नव्हे तर देशोदेशींच्या सीमा सुद्धा आता बंद होत आहेत.गळाभेट तर दूर  हस्तांदोलन निषिद्ध झालंय.. लोक एकमेकांकडे बघायला सुद्धा घाबरत आहेत... पुण्यात मास्क लावून फिरणाऱ्याची संख्या virus पेक्षा जास्त गतीने वाढतेय..


आरोग्य खात्याचे दरवाजे मात्र अजूनही उघडे आहेत.24×7 सेवा देत आहेत समुपदेशन करत आहेत... उपचार करत आहेत..आम्ही अजूनही पेशंटची तपासणी उघड्या हातांनी करीत आहोत. सर्दी ,खोकला आणि तापाचे रूग्ण बघितल्यानंतर आम्ही तीन मीटर दूर पळणे तर सोडा मात्र त्याच्या जवळ जाऊन त्याला इंजेक्शन, सलाईन, ड्रेसिंग व ऍडमिट करून उपचार करीत आहोत. किती जण कश्या प्रकारे व्यावसायिक  आपले उकल पांढरे करीत आहेत..हे उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय.. मास्क च्या नावाखाली नावाखाली कशी लूट चालू आहे..पैसा हेच आयुष्याचं अंतिम मूल्य आहे असा समज असणाऱ्या समाजात मग
कुठेही जा पर्यटन असो अथवा सणासुदीच्या दिवाळी ,दसऱ्याची खरेदी असो ..या काळात  ज्याप्रमाणे हॉटेल आणि वाहनांचे दर वाढलेले असतात... त्याप्रमाणे एकही डॉक्टरने त्याची फी तर वाढवली नाही ..या साथीच्या काळात कित्येक पुणेकर, मुंबईकर यांना आई, वडील त्यांचं मूळ गाव आठवलं आणि सुट्टी काढून काही दिवस गावी जायचा विचार यायला लागलाय..
 आरोग्य कर्मचारी  मात्र स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालून corona virus चा अटकाव कसा करायचा याच्या प्रयत्नात आहेत आणि इथं काही मंत्रीच Go Back corona च्या घोषणा देण्यात मश्गुल आहेत. पण आरोग्य कर्मचारी ही एकमेव जमात आहे ज्यांना करोना व्हायरसचा जास्तीत जास्त धोका असूनही ते त्यांच्या कामापासून एकही पाऊल मागे हटलेले नाहीत…!


कधीतरी चुकीच्या वेळी या कर्मचाऱ्यांवर हात उचलताना, त्याला रक्तबंबाळ करताना ,त्याला शिवीगाळ  करताना, एवढेच नव्हे सरसकट सगळ्या  अपशब्द उच्चारताना यापुढे काळजी घ्याल, एवढीच आम्हा  जमातीची अपेक्षा...!!


स्वतःच्या कामावरची निष्ठा आणि माणुसकीची जाण असणाऱ्या असंख्य  आरोग्य कर्मचाऱ्यांना ञिवार वंदन


मनोहर सिताराम खंदारे (नवी मुंबई)


 


 


महाराष्ट्राचा "नायक"


मुख्यमंत्री झाल्यापासून "उद्धव बाळासाहेब ठाकरे" ज्या पद्धतीने काम करत आहेत, महत्वाचे निर्णय घेत आहेत ते पाहून या आधी त्यांच्यावर केलेली टीका आता चूक वाटते, काही माणसांना संधी मिळाली तर ते सोनं करून दाखवतात .. याच उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे


ठाकरे कुटुंबाला खुद्द मैदानात न उतरता बाहेरून रिमोट चालवण्याचा "शौक" होता, पण नेमक्या परिस्थितीत नालायक भाजप सरकारला चाप लावून लगाम स्वतःच्या हातात घेऊन स्वतः नेतृत्व करण्याचा निर्णय आधीच्या सर्व त्यांच्याच परंपरांना छेद देणारा आणि आव्हानात्मक होता.तुलनात्मक राज ठाकरे पेक्षा मिळमिळीत वाटणारे, फोटोग्राफी पिंड असणारे उद्धव ठाकरे सक्षमपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळतील का हा प्रश्न सर्वांसमोर होता, पण त्यांनी आपल्या कामातून प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं ..


मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती, शेरवानी, ज्याकेट, सुट वगैरे परिधान करतात पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचं नेहमीचा भगवा सदरा वगैरे सुद्धा जवळ न करता साधी शर्ट पँट असा पेहराव ठेवला आहे त्यातून त्यांनी या पदाला प्रामाणिकपणा आणि साधेपणा बहाल केला आहे तो अत्यंत सुंदर आणि गरजेचा आहे, खुर्ची चा माज, आडनावाचा माज, एका आक्रमक संघटनेचा म्होरक्या म्हणून लवलेश सुद्धा त्यांच्या देहबोलीतून जाणवत नाहीये, घरातील ज्येष्ठ व्यक्ती प्रमाणे ते प्रत्येक विषयावर व्यक्त होत आहेत, सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेत आहेत ते खूप आश्वासक आहे, सकारात्मक आहे
स्टेजवरून भगव्या सदऱ्यात धार्मिक वलगणा करणारा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री झाल्यावर रीतसर संसदेत जाऊन भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे फार फार वेगळे आहेत


मतभेद होते, राहतील, वेळप्रसंगी टीका सुद्धा करू, पण चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे ..


महाराष्ट्राला ठाकरे सरकार उन्नतीच्या मार्गाने घेऊन जाईल, महाराष्ट्रासमोर असलेले तमाम प्रश्न, जातीयवाद ते औद्योगीकरण असे निरनिराळे प्रश्न सोडवून प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देतील ही अपेक्षा ...आणि सदिच्छा 💐


लवकरच मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतोय !


अमोल गायकवाड (फेसबूक)टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com