Top Post Ad

कर न भरणाऱ्यांवर कडक कारवाई 

कर न भरणाऱ्यांवर कडक कारवाई ठाणे 
 महापालिकेची मालमत्ता कराची वसुली, पाणी बिल वसुली व इतर वसुलीबाबतची आढावा बैठक आज नागरी संशोधन केंद्र येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये आज श्री.अहिवर यांनी विविध विभागनिहाय वसुलीचा आढावा घेवून वसुलीचे जे उद्दिष्ट दिले आहे ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी गंभीरपणे काम करा. कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर व पाणी कराचे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबतच जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत त्यांना नोटीस देवून कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर यांनी २६ फेब्रुवारी रोजी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुखांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.    
मालमत्ता कर वसुलीसाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कर निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर वसुलीसाठी कठोर पावले उचलावित. जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत त्यांना नोटीस देवून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश देतानाच ब्लॉकनिहाय थकबाकी वसुली करण्याला प्राध्यान्य द्यावे .  पाणी वसुलीबाबत ज्या नळसंयोजन धारकांनी अद्यापपर्यत पाण्याच्या बिलाचा भरणा केलेला नाही त्यांचे नळसंयोजन खंडीत करून त्यांचे पंप जप्त करण्याचे निर्देश दिले.  नळसंयोजनधारक देय असलेल्या पाणीबिलाची रक्कम थकीत रकमेसह 29 फेब्रुवारीपर्यत 2020 एक रकमी भरतील अशा नळसंयोजनधारकांना त्यांच्या पाणी बिल आकारावरील दंड / व्याजाच्या रकमेमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जे नळसंयोजनधारक 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यत पाणीबिलाची पूर्ण रक्कम एक रकमी भरतील त्यांच्या पाणी बिल आकारावरील दंड / व्याजाच्या रक्कमेत 40 टक्के सूट देण्यात येणार आहे. याची माहिती व्यापक प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचवण्याचेही त्यांनी  सांगितले.  
   ठाणे महापालिका क्षेत्रातील वन विभागाची जमिन, सीआरझेड, गुरचरण, शासनाच्या जमिनी व इतर प्रतिबंधीत क्षेत्रावरील बांधकामधारकांना महापालिकेच्या पायाभूत सेवासुविधांचा लाभ हात असल्याने त्यांना सेवा शुल्क  आकारणी करून वसूल करणेबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबत उप आयुक्त स्तरावर सहाय्यक आयुक्त, भूमापक व कर निरीक्षक यांची बैठक घेवून लवकरात लवकर वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com