Top Post Ad

मराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका

मराठी तरुणांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका



नवी मुंबई :


बेलापूर येथे जलवाहतूक करणाऱ्या एका कंपनीने कर्मचारी भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत महाराष्ट्रीय तरुणांना अर्ज करण्यास मनाई करण्यात आली. ही माहीती मिळताच मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली. आणि व्यवस्थापनाला जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने माफिनामा लिहून दिला आणि जाहिरातही मागे घेण्याचे आश्वासन दिले. 
नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर सेक्टर ११ येथील वाणिज्य संकुलात सेफसेस या जलवाहतूक करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या तरुणांची जाहीरात कंपनीने एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली.  त्यामध्ये महाराष्ट्रीयन नसलेल्या तरुणांना प्राधान्य देण्यात येईल असे नमूद केले. ही जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने मराठी तरुणांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली. महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना मराठी तरुणांना डावलणाऱ्या या कंपनीची दखल मनसेने घेत थेट व्यवस्थापनावर हल्लाबोल केला. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी काही कार्यकर्त्यांना कार्यालयात पाठवले. यावर व्यवस्थपानाने नरमाईची भूमिका घेत जाहिरात मागे घेतली आहे. तसेच झालेल्या प्रकाराबाबत माफिनामाही दिला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com