या घुसखोरांना त्वरीत हाकलावे- राजे प्रतिष्ठानची मागणी
पनवेल : नवी मुंबई परिसरातील बहुतांश बार व लॉजिंग मध्ये बांगलादेशी महिला व मुलींचे प्रमाण दिसून येत आहे. कायद्याचा अधिकार वापरत जितके शक्य होईल तितक्या बार व लॉजिंगची चौकशी करावी व बांगलादेशी महिला, मुली, वेटर यांच्यावर कडक कारवाई करून अशा बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या बार चालक मालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पत्राद्वारे केली आहे. याआधी देखील बार बंदीसाठी मुंडण आंदोलन राजे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आले होते. मात्र पुन्हा बार चालक हे कायद्याला फाट्यावर मारण्याचे काम करीत आहेत तरी संबंधित प्रशासनाने याबाबत कडक मोहीम राबवून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांना नवी मुंबई परिसरातील कुठल्याही बार, लॉजिंग अँड बोर्डिंग याठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून आल्यास आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने पकडून जवळील पोलीस ठाण्यात स्वाधीन करू असे देखील केवल महाडिक यांनी या पत्रात नमूद केले आहे.
याबाबतचे पत्र राजे प्रतिष्ठान पनवेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार, नवी मुंबई पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल व संबंधीत पोलीस ठाणे यांना दिले आहे.
0 टिप्पण्या