Top Post Ad

वन रुपी क्लिनिकच्या आरोग्य शिबिराला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

वन रुपी क्लिनिकच्या आरोग्य शिबिराला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 



ठाणे 
मध्य रेल्वे मार्गावरील कळवा रेल्वे स्थानक येथे सेंट्रल रेल्वे वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून भारतीय मराठा संघाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या या शिबिरात शेकडो प्रवाशांनी विविध टेस्ट करून आरोग्याची तपासणी करून घेतली.  या शिबिराचे उदघाटन कळवा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर के. जी. विनोद आणि भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मोफत मध्ये ब्लड ग्रुप, शुगर, कान, नाक, घसा, डोळे, ईसीजी, ब्लड प्रेशर, त्वचांचे विकार, थायरॉईड, वजन, बीपी चेकअप अशा विविध तपासणी करण्यात आल्या. 
या शिबिरात मुंबई पासून कळवा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, उल्हासनगर येथून आलेल्या प्रवाशांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिराला वन रुपी क्लिनिकचे संचालक राहुल घुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  रेल्वेतुन लाखो प्रवासी प्रवास करत असतात, प्रवास करत असताना गर्दीमुळे अनेक प्रवाशांना आजारांना सामोरे जावे लागते. कार्यालयीन कामातून लोकल प्रवास करताना आपल्या आरोग्याकडे प्रवाशांचे लक्ष लागत नाही. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी प्रवाशांनी वेळीच घेण्याकरिता कळवा रेल्वे स्थानकात मोफत पने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे यापुढे देखील आणखी काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर मोफतमध्ये आरोग्य शिबीर घेणार असल्याचे पवार यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले. 
यावेळी भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, उपाध्यक्ष दीपक पालांडे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम, कोषाध्यक्ष अजित जाधव, ठाणे शहर अध्यक्ष निलेश म्हसकर, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा अनघा जाधव, ठाणे शहर अध्यक्ष तपस्या कश्यप, उपशहर अध्यक्ष कांचन साळुंखे, ऍड उमा धापते, कल्याण तालुका अध्यक्ष सीमा बोडके, विद्या माने, जितेंद्र माने, विशू पोटे, मुंबई उपाध्यक्ष सविता मोरे, डॉ. सयी खबाले, डॉ. जोगेंद्र सिंग, भावना कोयंडे, सरिता सापले, वैभवी तांबे, अश्विनी कुंभार, नम्रता पाटील, कळवा स्टेशन मास्तर के. जी. विनोद आदी मान्यवर उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com