Top Post Ad

विद्यार्थ्यांच्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारे शिक्षक सर्वश्रेष्ठच- . कांतीलाल कडू 

विद्यार्थ्यांच्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारे शिक्षक सर्वश्रेष्ठच- . कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन 



पनवेल
विज्ञानाचा एक एक पदर उलगडत माणूस जगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहे. त्यांच्यातील ती जिज्ञासा जागवण्याची शक्ती पेरणारे आणि विद्यार्थी दशेतच त्याच्या पंखांत ज्ञानाचे बळ देणारे शिक्षक सर्वश्रेष्ठच असल्याचा दावा  सामाजिक कार्यकर्ते  कांतीलाल कडू यांनी केला. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा माध्यमिक शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पनवेल महापालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून  आशा  म्हस्के, नेहा  पाटील, ज्योती  म्हात्रे, वैष्णवी  आंबेकर, कविता  गायकवाड, संदीप तापकीर, सोनाली पाचपुते, दिव्या घाडी, संगिता देशमुख, विजया चव्हाण, सारिका साळवे, आदिका सावंत, हिराबाई विधाते, सुरेखा ठोंबरे, रेवती कर्‍हाळे,  रचना कदम, उषा देवकुळे, पांडुरंग साळुंखे, तसेच सांस्कृतिक व क्रीडा मंडळ शिक्षक वर्गामध्ये प्रमिला म्हात्रे, अरुणा भगत, काळूराम ढेबे, वामन खैरनार, सोनल पिसाळ, वैशाली राऊत, आशा म्हात्रे, दशरथ म्हात्रे, कुमार मंडळे, जयश्री कांबळे, रत्नमाला माळी, संजय पाटील, सुरेखा करंजुले उपस्थित होते.
हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रमुख उपस्थितीचे कौतुक करताना कडू पुढे म्हणाले, पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय असणे हे उत्तम प्रशासकाचे लक्षण असते, असे सांगून शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणाताई उरणकर आणि त्यांच्या सर्व शिक्षकांनी समन्वयाचा डोलारा उत्तमरित्या सांभाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी दाद दिली. विद्यार्थी दशेतील संस्कार जीवनात महत्वाचे ठरतात. संत साईबाबा शाळेच्या विद्यार्थ्यांनी ते विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध करून दाखवून दिले आहेत, असे सांगत महापालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक, मुख्याध्यापिका आदींचे कौतुक केले.
वार्षिक शालेय स्पर्धेत शंभर मीटर धावणे, बटाटा शर्यत, बेडूक उड्या, लंगडधाव, चमचा लिंबू,  वक्तृत्व, ग्रिटींग कार्ड, हस्ताक्षर,  वेशभूषा आदी स्पर्धा पार पडल्या. शाळेच्या  सहाय्यक शिक्षिका गोखले यांनी संगीत विशारद पदवी संपादन केल्याने त्यांचा  विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेमध्ये योग प्रशिक्षण देणारे आतंरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त रत्ना कलावार तसेच त्यांचे सहकारी अण्णासाहेब आहेर यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन सहशिक्षक देविदास गायकवाड यांनी उत्तमरित्या केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com