निकोलस कोपर्निकस
पोलंडमधील गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
जन्मदिन - फेब्रुवारी १९,१४७३
निकोलस कोपर्निकस (फेब्रुवारी १९,१४७३ - मे २४,१५४३) हा पोलंडमधील गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. याने ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यास पाखंडी ठरवून त्याचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला
कोपíनकस यांनी आपली खगोलशास्त्रासंदर्भातली मतं ‘दि रीव्होल्युशनिबस ऑर्बटिम सेलेस्टीयम’ म्हणजेच ‘अवकाशीय ग्रहगोलांचे कक्षीय परिभ्रमण’ या पुस्तकात मांडली. त्यांच्या या पुस्तकाचं हस्तलिखित १५३० सालीच तयार होतं. पण, धार्मिक आणि राजकीय विरोधामुळे कोपíनकस हे पुस्तक ताबडतोब प्रकाशित करू शकले नाहीत. १५४० साली त्यांचे अनुयायी जॉर्ज रहेटिकस यांनी या कल्पनेचा गोषवारा प्रसिद्ध केला. पण मूळ ग्रंथ मात्र १५४३ साली कोपíनकस मृत्युशय्येवर असताना प्रसिद्ध झाला. मृत्यूच्या एक दिवस आधी या पुस्तकाची प्रत कोपíनकस यांना पाहाता आली. या पुस्तकाचे पृथ्वी गोल असून ती फिरत असते, ताऱ्यांची यादी आणि त्रिकोणमितीवरील भाष्ये, सूर्याच्या वार्षकि भासमान गतिमार्गासंबंधीचे विवरण, चंद्र, ग्रहांसंबंधीची माहिती असे एकूण सहा खंड आहेत. लॅटिन भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाची काही प्रकरणे विकिपीडियाच्या संकेतस्थळावर पाहता येतात.
चर्चच्या मतप्रवाहाविरुद्ध भाष्य करणाऱ्या या पुस्तकावर १६१६ मध्ये बंदी घालण्यात आली आणि तब्बल दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत म्हणजे १८३५ पर्यंत ही बंदी कायम होती. दरम्यान या पुस्तकाला पािठबा देणाऱ्या गॅलिलिओ यांनाही धर्मगुरूंनी शिक्षा सुनावली होती. खरं म्हणजे, गॅलिलिओ यांनी १६०९ साली गुरू ग्रहाच्या उपग्रहांवर केलेल्या संशोधनादरम्यान कोपíनकस यांच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला पुष्टी मिळाली.
* असं म्हटलं जातं की, कोपíनकस यांच्या संशोधनामुळे वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात झाली. कोपíनकस यांच्या सूर्यकेंद्री ग्रहमालेच्या संकल्पनेमुळे गॅलिलिओ, केपलर आणि न्यूटन यांच्या संशोधनाला चालना मिळाली. या वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात कोपíनकस यांच्यापासून झाली आणि न्यूटन यांनी दीडशे वर्षांनंतर ती पूर्णत्वाला नेली. खगोलशास्त्रातील या १५० वर्षांच्या संशोधनाचा आढावा घ्या.
* खगोलशास्त्राखेरीज कोपíनकस यांनी कोणकोणत्या विषयांवर संशोधनपर पुस्तकं लिहिली याची माहिती मिळवा.
* कोपíनकस यांच्याप्रमाणेच ज्या समकालीन संशोधकांना धर्माचा विरोध सहन करून संशोधन करावं लागलं, अशा संशोधकांबद्दल माहिती मिळवा.
* सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. ग्रह वर्तुळाकार कक्षेतच का फिरतात? यामागची कारणमीमांसा करा.
* एखाद्या ग्रहाची गती ‘वक्री’ होणे म्हणजे काय? हे समजून घ्या.
* जोहान केपलर यांनी ग्रहगोलांची गती स्पष्ट करणारे नियम मांडले. ‘केपलरचे नियम’ म्हणून ते प्रसिद्ध आहे.
0 टिप्पण्या