Top Post Ad

महाराष्ट्रात दिल्ली प्रयोग अशक्य!

महाराष्ट्रात दिल्ली प्रयोग अशक्य!केजरीवाल पेक्षा शंभर पट मोठा राजकीय प्रयोग बाळासाहेबांनी महाराष्ट्रात केला पण दुर्दैव या मातीच येते जातीचे केंद्र इतकी बलशाली आहेत की तिला आंबेडकर आडनावाची एलर्जी आहे. आम आदमी पार्टी पेक्षा मोठा प्रयोग वंचित बहुजन आघाडीने केला. वांचीतचा जाहीरनामा आपपेक्षा प्रभावी होता. आरोग्य, शिक्षण मोफतच अजेंडा वंचितने मांडला. महाराष्ट्रासारखी जातीयता या देशात कुठेही नाही. दिल्लीत जातीयता नाही महाराष्ट्रात महापुरुषांचा जन्म झाला त्यांनी जातीयता नष्ट करण्यासाठी खूप मोठा लढा दिला. तरी सुद्धा ही जातीयता संपलेली नाही. बाळासाहेबांनी राजकीय क्रांतीसोबतच सामाजिक क्रांतीचा एल्गार पुकारला वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली असती तर विकास, समानता याचं मोठं सकारात्मक चित्र दिसलं असतं.
कितीही जनतेच्या विकासाचा प्रभावी अजेंडा बनवला. सगळंच फुकट देण्याचा जाहीरनामा बनवला तरी येते "गुलाल आणि निळ" चा प्रयोग या सर्व परिवर्तनवादी सिद्धांतावर हावी होतो. आणि जातीच्या गणितावर महाराष्ट्र जिंकला जातो. जाती कर्मठ केल्या की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसते आणि शरद पवार हे विजेता होतात. म्हणजे फक्त जात कर्मठ करण्याचा अजेंडा येते चालतो आणि तोच विजयी होतो. भोसले, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराने देशाला दिशा दिली दुर्दैव या त्यांच्याच कर्मभूमीचे की जिथे जातीच्या नावावर निवडणुका होतात आणि त्या जिंकल्या जातात. त्यामुळे दिल्लीचा निकाल हा त्या भूमीत जातीयता अस्पष्ट असल्यामुळे मिळाला आहे, नेता दलित नाही आणि मतदार विकासाच्या भाषा बोलणाऱ्या पाठीशी आहे. ज्या राज्यात जात वास्तव प्रभावी आहे तिथे केजरीवाल निर्माण होणार नाहीत. ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितची बांधलेली मोट यशस्वी राजकीय क्रांती होती तिला त्या नेत्याच्या जातीच्या मुद्धावर गुरफटून टाकण्याचा पराक्रम ज्यांनी केला. ते या महाराष्ट्रात गुलाल की निळ, रंगांच्या, जातीच्या नावावर सत्ता उपभोगण्याचा पराक्रम करून स्वतःला राजा म्हणत ऊर बडवतील. जाती जिवन्त ठेवण्यासाठी त्या त्या जातीसाठी महामंडळ विशेष बजेट काढतील, हडकं टाकतील पण माणसासाठी आरोग्य, शिक्षण, वीज मोफत देण्याचा निर्णय कुणी घेणार नाही.
या भूमीतलं राजकारण ज्या दिवशी विकासाच्या, माणसाच्या प्रश्नांवर लढलं जाईल त्या दिवशी येते फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच सरकार येईल. आप च्या विजय होतो मग महाराष्ट्रात बदल का होत नाही म्हणणं मूर्खपणा आहे. येतली भौगोलिक परिस्तिथी आणि माणसाची वैचारिक क्षमता यामुळे परिवर्तन अशक्य आहे. परिवर्तन नक्की होईल पण त्यासाठी कालावधी लागणार आहे. वंचितने टाकलेलं पाऊल हे बदलाकडे घेऊन जाणार आहे गुलाल आणि निळ या कर्मठ संकल्पनेला मातीत घालणारी आहे. आशावादी लढाऊ असणं हाच आंबेडकरी कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे.


- दिपक केदार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com