Trending

6/recent/ticker-posts

नवी मुंबई पालिका जिंकण्यासाठी महाआघाडी सज्ज

नवी मुंबई पालिका जिंकण्यासाठी महाआघाडी सज्ज


नवी मुंबई या वर्षी होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती महाविकास आघाडीच्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यात आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात पार पडणाऱ्या या मेळाव्यात नवी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने काय घोषणा केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राज्यात जो फॉर्म्युला वापरला तोच वापरुन महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने धोरण आखणी सुरु झाली आहे अशीही चर्चा होत आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.  एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी झाल्यास भाजपाची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Post a Comment

0 Comments